Dahi handi 2023 : गो…गो…गोविंदा! दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार मोठ्या हंडी
Dahihandi 2023 : रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या गोविंदांना गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या हंडीसाठी कलाकारांची हंडी आणि राजकीय नेते देखील या हंडीला उपस्थित असणार आहे .

ठाणे : दहीहंडी अवघी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ठाण्यातील (Thane News) दहीहंडी (DahiHandi 2023)मोठ्या जल्लोषात साजरं करण्याचं आयोजकांनी ठरवलंय. यंदा नऊ थराचा रेकॉर्ड तोडणाऱ्यांना गोविंदा पथकास संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे 21 लाख रुपयांचं बक्षीस तर दहा थर लावणाऱ्यांना संकल्प प्रतिष्ठान 11 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या गोविंदांना गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या हंडीसाठी कलाकारांची हंडी आणि राजकीय नेते देखील या हंडीला उपस्थित असणार आहे .
संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे नऊ थराचा रेकॉर्ड तोडणाऱ्यांना गोविंदा पथकास 21 लाखाचे बक्षीस
आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात यावर्षी नऊ थरांनपेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी 21 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे .विशेष म्हणजे पहिल्यांदा नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून नंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्त्येक गोविंदा पथकाला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.तर नऊपेक्षा कमी थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी ही यावेळी बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्यात आली असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली आहे.या उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
स्थळ - वर्तकनगर, ठाणे
थरांकरता 11 लाख रुपयांचा बक्षीस, संकल्प प्रतिष्ठान आयोजक आणि आमदार रवींद्र फाटक यांची घोषणा
ठाण्यातील संकल्प दहीकाला महोत्सवाचे यंदाचे 18 वे वर्ष मोठ्या जल्लोषात साजरे करण्याचे ठरवले असून दहा थरांकरता 11 लाख रुपयांचा बक्षीस व सलामी करता लाखोच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. तसेच मुंबई ठाणे व महिलांसाठी अशा तीन वेगवेगळ्या दहीहंडी बांधण्यात आलेल्या आहेत. या सर्वांना रोख रक्कम आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गोविंदांना गौरविण्यात येणार आहे.त्याचबरोबर कलाकारांची हंडी आणि राजकीय नेते देखील या हंडीला उपस्थित असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्यासमवेत अनेक मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित असणार आहे गोविंदाच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपायोजना संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
स्थळ - रघुनाथ नगर , ठाणे
मानाच्या दहीहंडीसाठी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक
मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. आनंद दिघे यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. यंदा पुन्हा एकदा त्याच दिमाखात यंदा अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येतात. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी एक लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
स्थळ - टेंभीनाका, ठाणे
हे ही वाचा :























