एक्स्प्लोर

Vasai Virar Police : बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या 166 परदेशी नागरिकांचा विरार पोलिसांवर आर्थिक अन् मनुष्यबळाचा ताण; दिवसाला 51 हजारांचा खर्च

Vasai Virar Police : व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करणाऱ्या मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय समोर आता आर्थिक व मनुष्यबळाचा ताण उभा राहिला आहे.

Vasai Virar Police : व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर फेब्रुवारीत मोठी कारवाई करणाऱ्या मिरा भाईंदर वसई विरार पोलीस (Mira-Bhayandar, Vasai-Virar Police) आयुक्तालय (MBVV) समोर आता आर्थिक व मनुष्यबळाचा ताण उभा राहिला आहे. सुमारे 240 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 166 परदेशी नागरिक सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या जेवण-निवास आणि देखभालीसाठी दररोज सुमारे 70 हजार रुपये खर्च होत आहेत. नालासोपाऱ्यातील (Nalasopara Crime News) प्रगतीनगर परिसरात व्हिसा कालबाह्य झाल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. तपासादरम्यान काही जण अमली पदार्थ तस्करी प्रकरणात संशयित असल्याचेही समोर आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली.

Vasai Virar Police : स्थानिक पोलिसांवर जबाबदारी, खासगी मॉलच्या खोल्या, सभागृहे घेतले भाड्याने

दरम्यान, अटक केलेल्या नागरिकांच्या देखभालीची जबाबदारी आता स्थानिक पोलिसांवर पडली असून, त्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. मुंबईतील भोईवाडा, दादर येथे आधुनिक निर्वासन (डिपोर्टेशन) केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या केंद्राचे उद्घाटन रखडले असून ते अद्याप सुरू झालेले नाही. परिणामी, वसई, विरार, नालासोपारा आणि माणिकपूर परिसरातील तात्पुरत्या केंद्रांमध्ये या नागरिकांना ठेवावे लागत आहे. यासाठी खासगी मॉलच्या खोल्या तसेच महापालिकेची सभागृहे भाड्याने घेण्यात आली आहेत.

Vasai Virar Police : 35 किलो चिकन, 40 किलो मटण; दररोज 51,800 रुपये खर्च

दरम्यान, ताब्यात असलेल्या नागरिकांमध्ये नायजेरिया, घाना, युगांडा आणि टांझानिया या आफ्रिकन देशांतील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या आहारानुसार दररोज 35 किलो चिकन, 40 किलो मटण, 400 अंडी, मोठ्या प्रमाणात ब्रेड, पाव, दूध, फळे तसेच तांदूळ आणि इतर धान्याचा पुरवठा केला जातो. या सर्व खर्चासाठी एकट्या तुळींज पोलीस ठाण्यातून दररोज 51,800 रुपये खर्च होत आहेत. तर वालीव, नायगाव, वसई, आचोळे आणि माणिकपूर पोलीस ठाण्यांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये दररोज नाश्ता व चहासाठी खर्च केले जात आहेत.

दररोजचा वाढता खर्च आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ यामुळे स्थानिक पोलिसांवर दुहेरी ताण निर्माण झाला आहे. निर्वासन केंद्र कार्यान्वित होईपर्यंत हा आर्थिक बोजा सहन करावा लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच प्रशासनाच्या आर्थिक नियोजनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget