एक्स्प्लोर

Badlapur IVF Racket : स्त्री बीज विक्रीचं राज्याबाहेर कनेक्शन; एकाच महिलेचा अनेकदा डोनर म्हणून वापर, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Badlapur Crime News: बदलापुरात स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकारणाचे (Badlapur Uterine Eggs Selling Racket) कनेक्शन हे राज्याबाहेर असल्याचे तपासात समोर आले आहे.

Badlapur Crime News: बदलापुरात स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकारणाचे (Badlapur Uterine Eggs Selling Racket) कनेक्शन हे राज्याबाहेर असल्याचे तपासात समोर आले आहे. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे यांना या प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. यांच्या पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांकडून तिघींची कसून चौकशी करून त्यांचा कोणत्या डॉक्टर, हॉस्पिटल आणि IVF सेंटरसोबत कनेक्शन (Badlapur IVF Racket) आहे हे समोर येणार आहे. शिवाय या टोळीने महिलांचे बनावट आधार कार्ड तयार करून एकाच महिलाचं वेगवेगळ नाव वापरून तिला अनेकदा डोनर बनवलं आहे.

दरम्यान, या आरोपींनी आपल्या इतर टोळीच्या सदस्यांच्या मदतीने महिलांचे बनावट सत्यप्रतिज्ञा पत्र, आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही समोर आले आहे. तर आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो, महिलांचे खोटे आधारकार्ड तयार करून डोनर बनवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

Badlapur Crime: आरोपींच्या मोबाईलमध्ये बनावट कागदपत्रांचे फोटो, डोनर महिलांना 25 ते 30 हजार रुपये

दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपींच्या मोबाईलमध्ये असंख्य महिलांचे फोटो, इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाचे फोटो, बनावट कागदपत्रांचे फोटो, आर्थिक व्यवहाराचे फोटो मिळून आले आहेत. 500 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांचा यासाठी वापर करण्याचा आल्याचा संशय आहे. डोनर महिलांना 25 ते 30 हजार रुपये दिले जात होते, तर आरोपी यात गरजू महिलांना हेरून त्यांच्यातील स्त्री बिजाची विक्री करायचे. या टोळीतील सदस्य विविध टप्प्यावर आपापली कामगिरी पार पाडत होते. पोलिसांची तीन पथक या प्रकरणातील तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय नवी माहिती उघड होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Badlapur Crime News: घरातूनच सुरू होता बेकायदेशीर प्रकार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरातच स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती. आर्थिक गरज असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या प्रक्रियेसाठी तयार केले जात होते. डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता महिलांची सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. या इंजेक्शन्समुळे गर्भाशयातील स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये पाठवले जात होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Beed Crime Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Nanded Crime: 'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ
'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Embed widget