एक्स्प्लोर

Abp Majha Impact : डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांना दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयुक्तांना फोन, म्हणाले....

KDMC : डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींच्या संदर्भात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनव्दारे संपर्क साधून रहिवाशांना कसा दिलासा दिला जाईल यावर चर्चा केली.

Dombivli News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 65 इमारत रेरा घोटाळा प्रकरणी डोंबिवली आयरेगावातील समर्थ कॉमप्लेक्स (Samarth Complex) इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली होती. यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या इमारतीती रहिवाशी हवालदिल झाल्याचे बघायला मिळालं. दरम्यान, या संदर्भात बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या बातमीची आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात रात्री उशीरा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोनव्दारे संपर्क साधून इमारतीतील रहिवाशांना कसा दिलासा दिला जाईल यावर चर्चा केली. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे रात्री उशिरा आयुक्तांच्या बंगल्यावर दाखल होऊन त्यांनी चर्चा केली. अनधिकृत इमारती प्रकरणी अधिवेशनात विषय घेऊन या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी क्लस्टर योजना राबवता येईल का? याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.

Eknath Shinde calls KDMC Commissioner : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना फोन

दरम्यान, निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील (KDMC) महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Demolition of Samarth Complex of Dombivli)या संदर्भात बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या बातमीची आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात रात्री उशीरा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनव्दारे संपर्क साधून इमारतीतील रहिवाशांना कसा दिलासा दिला जाईल यावर चर्चा केली. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय पाऊले उचलले जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Dombivli News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा शब्द महत्वाचा कि KDMC महत्वाची?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आश्वासन दिलं असताना आता पुन्हा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा शब्द महत्वाचा कि KDMC महत्वाची? असा सवालही या ठिकाणच्या स्थानिक महिलांनी विचारला आहे. घरांचे कर्ज सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना आणि डोक्यावर या कारवाईची टांगती तलवार असताना या कारवाईच्या नोटीसमुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आम्हाला आमच्या हक्काची रक्कम मिळाल्याला हवी, हक्काचे पैसे, अथवा घर देण्यात यावं, तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू, असेही स्थानिक महिला म्हणाल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Baba Khan: मोठी बातमी : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget