Telly Masala : सई ताम्हणकरचा ओटीटीवर जलवा ते आमिर खानचा लेक रुपेरी पडद्यावर, टीझर लाँच; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sai Tamhankar In Web Series : सई ताम्हणकरचा ओटीटीवर जलवा; 'डब्बा कार्टेल'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार, पाहा टीझर
Sai Tamhankar In Web Series : अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर आता हिंदी सिनेजगतात आपला छापस सोडत आहे. काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला 'भक्षक' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहे. 'डब्बा कार्टेल' (Sai Tamhankar) ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असून सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे. नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Netflix OTT Upcoming Release : भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने कंबर कसली; 19 चित्रपट, वेब सीरिजची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
Netflix OTT Release : भारतातील ओटीटी बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी नेटफ्लिक्सने (Netflix) कंबर कसली आहे. जगभरात नेटफ्लिक्स हे लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहे. नेटफ्लिक्सने भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. खास भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने चित्रपट आणि वेब सीरिज लाँच केले होते. आता, 2024 मध्ये नेटफ्लिक्सने भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेता वेब सीरिज (New Web Series On Netflix) आणि चित्रपटांची (New Movies On Netflix) घोषणा केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bollywood Remakes : बॉलिवूडमधील 'या' चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये होणार रिमेक, बॉक्स ऑफिसवर केली होती कमाल
Bollywood Remakes : बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेले काही चित्रपट हे प्रादेशिक अथवा इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक (Bollywood Remakes) असल्याचे समोर आले होते. आता, बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होणार आहे. मूळ मल्याळम भाषेतील असणाऱ्या 'दृश्यम' (Drishyam) या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये छाप सोडली. मोहनलाल यांनी साकारलेली भूमिका हिंदी चित्रपटात अजय देवगणने साकारली होती.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Anant-Radhika Pre Wedding : हॉलिवूडच्या रिहानासमोर बॉलिवूडचे कलाकार फिक्के; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी घेतलं 'इतकं' मानधन
Anant-Radhika Pre Wedding : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) जुलैमध्ये वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika ) लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुखपासून दीपिका पदुकोणसह अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
आणखी एक स्टार किड झळकणार रुपेरी पडद्यावर; आगामी 'महाराज'चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च
Aamir Khan Maharaj Movie : बॉलिवूडमध्ये (Bollywood ) आणखी एक स्टार किड रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा झुनैद (Junaid Kha) हा सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. झुनैदच्या पदार्पणाचा चित्रपट असलेल्या महाराजाचा फर्स्ट लूक टीझर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात झुनैद पत्रकाराच्या भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. तूर्तास झुनैदचा लूक आणि रोलबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Yash Raj Films : तुम्हाला 'यशराज'सोबत काम करायचंय? अॅप डाउनलोड करा अन् ऑडिशन द्या!
Yash Raj Films : बॉलिवूडमधील आघाडीचे प्रोडक्शन हाऊस असलेल्या यशराज फिल्मसने (Yash Raj Films) मोठा निर्णय घेतला. यशराज फिल्मसने आपले कास्टिंग अॅप (YRF casting App) लाँच केले आहे. या अॅपचा फायदा नवोदित कलाकारांना होणार आहे. अॅपच्या माध्यमातून यशराज पर्यंत इच्छुक कलाकारांना पोहचता येणार आहे.