![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आणखी एक स्टार किड झळकणार रुपेरी पडद्यावर; आगामी 'महाराज'चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च
Aamir Khan Maharaj Movie : आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या अभिनय पदार्पणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत होती. 'महाराज' चित्रपटातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे.
![आणखी एक स्टार किड झळकणार रुपेरी पडद्यावर; आगामी 'महाराज'चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च Aamir Khan Son Junaid Khan Debut in Bollywood Maharaj movie First Look Teaser Movies Releases On Netflix आणखी एक स्टार किड झळकणार रुपेरी पडद्यावर; आगामी 'महाराज'चा फर्स्ट लूक टीझर लॉन्च](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/01/0d81b6b34721991596f011a319ab94a61709266860860290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aamir Khan Maharaj Movie : बॉलिवूडमध्ये (Bollywood ) आणखी एक स्टार किड रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा झुनैद (Junaid Kha) हा सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. झुनैदच्या पदार्पणाचा चित्रपट असलेल्या महाराजाचा फर्स्ट लूक टीझर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात झुनैद पत्रकाराच्या भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. तूर्तास झुनैदचा लूक आणि रोलबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे.
आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या अभिनय पदार्पणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत होती. 'महाराज' चित्रपटातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने तीन चित्रपटांसाठी यशराज फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे. जुनैद खानच्या 'महाराज'शिवाय अनुपम खेरचा 'विजय 69' आणि वाणी कपूरचा 'मंडला मर्डर्स' प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सने प्रदर्शित होणाऱ्या या तीन चित्रपटाचे फर्स्ट लूक टीझर लाँच केले आहेत. महाराजच्या फर्स्ट लूक टीझरमध्ये आलिशान महाल आणि नृत्याचा भव्य नजारा दिसून येत आहे. जुनैद खानच्या लूकला यामध्ये दाखवण्यात आले नाही. त्याचा फर्स्ट लूक या टीझरमध्ये लपवण्यात आला आहे.
View this post on Instagram
'महाराज'ची कथा काय आहे?
'महाराज'चित्रपटामध्ये साई पल्लवी, शालिनी पांडे, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. वृत्तानुसार, 'महाराज' ची कथा 1862 च्या महाराजा लिबेलच्या प्रकरणावर आधारीत असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये एका धार्मिक पंथाच्या नेत्याने त्याच्या महिला अनुयायांसह अवैध संबंधांचा आरोप करत एका वृत्तपत्रावर खटला दाखल केला होता.
Aamir Khan with son Junaid Khan & Sai Pallavi seen in Japan shooting for an untitled project produced by Aamir himself..! #junaidkhan #Saipallavi #Aamirkhan pic.twitter.com/tRMjg9o4b3
— Pooja Suniramana (@PoojaSuniramana) February 12, 2024
झुनैदची भूमिका काय?
या चित्रपटात जुनैद पत्रकाराची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या जुनैद खानची भूमिका आणि लूक पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. जुनैद बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करत होता आणि खूप उत्सुक आहे. काही आठवड्यांपूर्वी तो वडील आमिर खान आणि अभिनेत्री सई पल्लवीसोबत जपानमध्ये शूटिंग करताना दिसला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)