Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Tamanna Bhatia & jayshree gadkar: बॉलीवूडची अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लवकरच मराठमोळ्या रुपात पाहायला मिळेल. ती आगामी चित्रपटात अभिनेत्री जयश्री गडकर यांची भूमिका साकारत आहे.

Tamanna Bhatia: बॉलीवूड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच मराठमोठ्या रुपात पाहायला मिळणार आहे. तमन्ना भाटिया ही ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. शांताराम (V. Shantaram biopic) यांच्या चरित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती दिग्गज मराठी अभिनेत्री जयश्री गडकर (Jayshree Gadkar) यांच्या भूमिकेत दिसेल. तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia) नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये जयश्री गडकर यांच्या रुपातील तमन्ना भाटिया पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया हिने मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi cinema) दंतकथा झालेल्या 'शेजारी' या चित्रपटातील 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' या गाण्यावर नृत्य केले आहे. या गाण्याच्या मेकिंगचा एक व्हिडिओ तमन्ना भाटिया हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. (Bollywood latest movies)
तमन्ना भाटिया हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना कृतज्ञतेची भावना बोलून दाखवली आहे. व्ही. शांताराम यांच्या बायोपिकमधील जयश्री गडकर यांच्या पोस्टरवर मिळालेल्या प्रेमळ प्रतिक्रिया या त्यांच्या मोहक रुपाला आणि त्यांचा समृद्ध वारसा याला समर्पित आहेत. व्ही. शांताराम यांनी काळाच्या पुढे विचार करुन चित्रपट तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीने भारतीय चित्रपटसृष्टीला एक आकार दिला. अशाप्रकारच्या आशयघन आणि उत्कट जगात पाऊल ठेवण्याची संधी मला मिळाली. जयश्री गडकरी यांची भूमिका मला अपेक्षेपेक्षा खूप काही शिकवणारी ठरली. या प्रवासातील आगामी गोष्टींची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे, असे तमन्ना भाटिया हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
व्ही शांताराम यांच्या या चरित्रपटात ती अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत प्रमुख भूमिकेत असेल. तमन्ना भाटिया ज्यांची भूमिका साकारत आहे, त्या जयश्री गडकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले होते. यामध्ये 'डॉ. अमर कोटणीस की अमर कहानी', 'शकुंतला', 'चंद्रराव मोरे' आणि 'दहेज' या चित्रपटांचा समावेश आहे.
View this post on Instagram
तमन्ना भाटिया हिने जयश्री गडकर यांची भूमिका साकारणे, ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले होते. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील प्रभावी व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. व्ही शांताराम या चरित्रपटाच्या निर्मात्यांनी जयश्री गडकर यांच्या भूमिकेसाठी मला निवडले, यासाठी मी त्यांची ऋणी असल्याचेही त्यांनी म्हटले. व्ही शांताराम यांच्या चरित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे हे करत आहेत.
आणखी वाचा
View this post on Instagram























