एक्स्प्लोर

Anant-Radhika Pre Wedding : हॉलिवूडच्या रिहानासमोर बॉलिवूडचे कलाकार फिक्के; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी घेतलं 'इतकं' मानधन

Anant-Radhika Pre Wedding : अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी हॉलिवूड गायिका रिहानाही पोहोचली आहे. रिहाना एका खासगी शो साठी मोठं मानधन घेते.

Anant-Radhika Pre Wedding : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) जुलैमध्ये वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika ) लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.  लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुखपासून दीपिका पदुकोणसह अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत. 

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी हॉलिवूड गायिका रिहानाही पोहोचली आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करणार आहे. रिहाना आपल्या टीमसह गुरुवारी जामनगरमध्ये दाखल झाली. रिहाना एका खासगी शो साठी मोठं मानधन घेते. 

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी किती मानधन?

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात अर्जित सिंह, प्रीतम, बी प्राक, दिलजीत दोसांझ , हरीहरन, अजय-अतुल आदींचे परफॉर्मन्स होणार आहेत. याच यादीत आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाचे नावही आहे. रिहाना ही जगातील महागड्या कलाकारांपैकी आहे.  

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानाने मोठी रक्कम आकारली असल्याचे वृत्त आहे. रिहानाने अंबानींच्या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतले, याचा आकडा अजून बाहेर आला आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिहानाने एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी 12 कोटी रुपये (1.5 दशलक्ष डॉलर) ते रुपये 66 कोटी (12 दशलक्ष डॉलर) शुल्क आकारले आहे.

रिहानाचे रिहर्सलचे व्हिडिओ व्हायरल 

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यापूर्वी रिहानाच्या रिहर्सलचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रिहाना तिची टीम आणि तिच्या स्टेज प्रॉप्ससह आली आहे.  गुरुवारी संध्याकाळी उशिरा ती रिहर्सल करण्यासाठी स्टेजवर पोहोचली. कार्यक्रमस्थळाचे दोन व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले आहेत, ज्यामध्ये रेहानाच्या परफॉर्मन्ससाठी मोठा स्टेज तयार करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणत्या गाण्यांवर रिहाना करणार परफॉर्मन्स?

रिहाना कोणत्या गाण्यांवर थिरकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. रिहाना आपले सुपरहिट गाणं डायमंड्सवर परफॉर्म करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय, बर्थ डे केक, राईट नाऊ, वाइल्ड थॉट्स, स्टे, लव्ह यासारखी परफॉर्म करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget