एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
... तर व्हॉट्सअॅप 2017 पासून लाखो स्मार्टफोनवर बंद होणार
![... तर व्हॉट्सअॅप 2017 पासून लाखो स्मार्टफोनवर बंद होणार You May Miss Whatsapp Messenger In 2017 ... तर व्हॉट्सअॅप 2017 पासून लाखो स्मार्टफोनवर बंद होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/04131618/Whatsapp-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : अपडेट न केल्यास पुढच्या वर्षीपासून लाखो स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअपमध्ये दिवसेंदिवस नवनवीन बदल केले जात आहेत. हे बदल जुन्या स्मार्टफोनसाठी सपोर्टीव्ह नाहीत, असं वृत्त 'मुंबई मिरर'ने दिलं आहे.
प्रत्येक स्मार्टफोन व्हॉट्सअॅपसाठी महत्वाचा आहे. मात्र भविष्यात येणाऱ्या आधुनिक बदलांसाठी हे फोन अनुपयोगी आहेत, असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
जुन्या आयफोनवरही व्हॉट्सअॅप बंद होणार
2017 पासून अनेक जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. याला आयफोन देखील अपवाद नाही. कारण आयफोनच्या 3GS आणि IOS6 वर व्हॉट्सअॅप बंद होणार असल्याचं बोललं जात आहे.
अँड्रॉईड 2.0, 2.2 वर चालणारे स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि विंडोज 7 वर व्हॉट्सअॅप चालणार नाही. त्यामुळे विंडोज युझर्सला अपडेट करणं आता गरजेचं होणार आहे.
दरम्यान व्हॉट्सअॅप ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, नोकिया S40 आणि नोकिया S60 या फोनवर जून 2017 पर्यंत चालणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
पुणे
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)