एक्स्प्लोर
शाओमीचा धमाका, Mi max तीन व्हर्जनमध्ये लाँच

नवी दिल्लीः शाओमीच्या आगामी Mi max या स्मार्टफोनच्या लाँचिंगची सर्वांनाच उत्सुकता होती. Mi max हा मच अवेटेड स्मार्टफोन शाओमीने नुकताच चीनमध्ये लाँच केला आहे. फोनची मेटल बॉडी बॉडी असून 6.44 इंचचा डिस्प्ले दिलेला आहे. बाजारात हा फोन सिल्वर, गोल्ड आणि डार्क ग्रे यां रंगांमध्ये उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील असणार आहे. Mi max तीन व्हर्जनमध्ये उपलब्ध
- शाओमी Mi max बाजारत तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. त्यापैकी 3GB रॅम, 32 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर हेफीचर असणारं एक व्हर्जन असेल. याची किंमत जवळपास 1499 रुपये एवढी असणार आहे.
- तर 3 GB रॅम, 64 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर असणाऱ्या व्हर्जनची किंमत 17 हजार रुपये असेल.
- तसंच 4 GB रॅम, 128 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर असणाऱ्या व्हर्जनची किंमत जवळपास 20 हजार 500 रुपये असेल, अशी माहिती शाओमीने दिली आहे.
आणखी वाचा























