Wi-Fi Tips : इंटरनेट स्लो असेल तर काय कराल? राऊटर कोणतं घ्याल?
वाय-फायच्या चांगल्या स्पीडसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये अशा ठिकाणी वाय-फाय राउटर करा जेणेकरुन त्याची रेंज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल.
Tech News : बरेचदा लोक तक्रार करतात की घरात Wi-Fi राऊटरचा स्पीड स्लो आहे. इंटरनेटचे चांगले प्लान घेतल्यानंतरही नेट खूप स्लो चालते. आपण देखील या समस्येचा सामना करत असाल तर तुमची समस्या सुटू शकते. वाय-फायचा स्पीड कसा वाढवायचा याच्या काही सोप्या टिप्स यासह कोणतं राऊटर खरेदी करावं हे देखील पाहुया.
वाय-फाय योग्य ठिकाणी सेट करा
वाय-फायच्या चांगल्या स्पीडसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये अशा ठिकाणी वाय-फाय राउटर करा जेणेकरुन त्याची रेंज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. राऊटर जमिनीवर किंवा भिंतीवर ठेवू नका. तसेच, हे लक्षात ठेवावे की त्याभोवती कोणतीही धातूची वस्तू नसावी.
अपडेट
स्मार्टफोनप्रमाणेच, वेळोवेळी वाय-फाय राउटर करत राहा जेणेकरून तो चांगला स्पीड देऊ शकेल. आपण ज्या कंपनीचे राऊटर वापरता त्या कंपनीच्या वेबासाईटवर जाऊन नवनवीन अपडेटविषयी माहिती घ्या.
अॅन्टिना
बर्याचदा वाय-फाय राउटरमध्ये, अँटिना खराब होते, ज्यामुळे वाय-फायचा स्पीड कमी होतो. असे बरेच राउटर आहेत ज्यांचे अँटिना बदलले जाऊ शकतात आणि आपणास चांगला वाय-फाय स्पीड मिळू शकेल.
रिपिटर्स
जर आपल्या वाय-फायची रेंज घरात एखाद्या ठिकाणी उपलब्ध नसल्यास आपण रिपीटर्स वापरू शकता. यासाठी आपण केबल वापरू शकता, यासह आपण वाय-फाय सिग्नलची रेंज वाढवू शकता.
सेटिंग्ज बदला
जर एखादी वेबसाइट वाय-फाय वापरत असताना उघडण्यास बराच वेळ घेत असेल तर आपल्याला त्याच्या सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. आपण वाय-फाय राउटर सेटिंग्जमध्ये जाऊन दुसरे DNS वापरू शकता. आपण Google चा पब्लिक DNS वापरू शकता. यानंतर आपली वेबसाइट उघडण्याचा स्पीड वाढेल.
आपण कोणता वाय-फाय राउटर विकत घ्यावा?
जर आपला वाय-फाय राउटर जुना झाला आहे आणि आपल्याला नवीन वाय-फाय राउटर खरेदी करायचा असेल तर आपण ड्युअल बँड राउटर खरेदी करा. ते आपल्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात Wi-Fi सिग्नल पोहोचवू शकतात.