(Source: Poll of Polls)
WhatsApp Update : व्हॉट्सअॅप तुम्हाला ठेवणार 'अप टू डेट', नवीन फिचरमुळे मिळेल अपडेटची माहिती
WhatsApp Update : व्हॉट्सअॅप (WhatsApp) मध्ये आता एक नवीन फिचर येणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे युजर्सला व्हॉट्सअॅपच्या प्रत्येक अपडेटची माहिती मिळणार आहे.
WhatsApp Latest Update 2022 : व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी भन्नाट आणि नवनवीन फिचर आणण्याच्या तयारीत असतो. कधी कधी प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणं युजर्ससाठी कठीण होऊन जातं. अनेक वेळा व्हॉट्सअॅपबाबतच्या नव्या अपडेट चाहत्यांपर्यंत उशिराने पोहोचतात. यावर उपाय म्हणून व्हॉट्सअॅप आता नवीन चॅटबॉट (Chatbot) अर्थात सॉफ्टवेअर अपडेट आणण्याच्या तयारीत आहे.
या फिचरमुळे युजर्सना प्रत्येक अपडेटची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. व्हॉट्सअॅपकडून (WhatsApp) या नवीन चॅटबॉटची (Chatbot) टेस्टिंग करण्यात येत आहे. यामुळे व्हॉट्सअॅपमध्ये येणाऱ्या नवीन फिचर अपडेटबाबत माहिती मिळेल. या अपडेट फिचरबाबत जाणून घ्या.
WABetaInfo ने दिली माहिती
व्हॉट्सअॅप वॉचडॉग WABetaInfo कडून या नवीन अपडेटबद्दल माहिती दिली आहे. हा चॅटबॉटबाबत संशोधन सुरु आहे. हे संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे. WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट शेअर करत व्हॉट्सअॅपबाबतच्या नवीन अपडेटबद्दल सांगितलं आहे. या चॅटबॉटमुळे युजर्सना व्हॉट्सअॅपवरच येणाऱ्या अपडेट आणि फिचरची माहिती मिळेल.
चॅटबॉट एका व्यावसायिक अकाऊंटप्रमाणे काम करेल
हे चॅटबॉट एका व्यावसायिक अकाऊंटप्रमाणे (Business Account) काम करेल. मात्र या चॅटबॉटला तुम्हाला रिप्लाय किंवा उत्तर देता येणार नाही. या अकाऊंटवर फक्त तुम्हाला मेसेज वाचता येतील. या चॅटबॉटचा उद्देश फक्त युसर्जना व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्स आणि इतर अपडेटची माहिती देणं आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअॅपशी संपर्क साधायचा असेल तर कंपनीने 2019 मध्ये लाँच केलेल्या टिपलाइनसह इतर माध्यमे आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या