Identify Fake Website : फोनवर वेबसाइट ओपन करताय? डेटा होईल हॅक, फेक वेबसाईट ओळखण्यासाठी काही टिप्स
फेक वेबसाइट तयार करणारे हॅकर्स त्या वेबसाइटच्या मदतीने तुमच्या फोनमधील बँक डिटेल्स आणि तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतात. जाणून घेऊयात फेक वेबसाइट ओळण्याच्या ट्रिक्स...
Identify Fake Website : स्मार्टफोनवर अनेक जण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स आणि इतर काही वेब साइट्स ओपन करतात. अनेक वेबसाइट या फेक असतात. अशा फेक वेबसाइट तयार करणारे हॅकर्स त्या वेबसाइटच्या मदतीने तुमच्या फोनमधील बँक डिटेल्स आणि तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतात. जाणून घेऊयात फेक वेबसाइट ओळण्याच्या ट्रिक्स...
1. HTTPS चेक करा
कोणतीही वेबसाइट ओपन करताना त्या वेबसाइटचा एड्रेस बार चेक करावा. एड्रेस बारच्या सुरूवातीला https://असे लिहीले असेल तर ती वेबसाइट सेफ आहे. https हा इंटरनेट प्रोटोकॉल आहे. हा यूझरने वेबसाइटला दिलेल्या सर्व सूचना एन्क्रिप्ट करते. त्यामुळे वेबसाइटला यूझरने दिलेली माहिती दुसऱ्या सर्व्हरकडे जात नाही. जर एखाद्या वेब साइटच्या सुरूवातीला https:// लिहीले नसेल आणि ती वेबसाइट तुम्ही स्मार्टफोनमध्ये ओपन केली, तर तुमचा डेटा चोरी होऊ शकतो.
2.URL पाहा
कोणतीही शॉपिंग वेबसाइट , बँकिंग वेबसाइट किंवा इन्फोर्मेटिव्ह वेबसाइट मोबाईलमध्ये ओपन करताना अॅड्रेस बारमधील URL पाहा. हॅकर्स अनेकदा प्रसिद्ध कंपनीच्या वेबसाइटच्या नावाचीच वेबसाइट तयार करतात. त्यामुळे URL मधील वेबसाइटच्या नावाचे स्पेलिंग चेक करावे.
3. वेबसाइटवरील महिती वाचा
फेक वेबसाइटमधील कंटेंटमध्ये अनेक चुका असतात. फेक वेबसाइटच्या माहितीमध्ये स्पेलिंग मिस्टेक असतात. त्यामुळे फेक वेबसाइट ओळखण्यासाठी वेबसाइटमध्ये दिलेली माहिती वाचून पाहावी.
4. Virus Total चा वापर करा
Virus Total ही प्रसिद्ध वेबसाइट आहे. Virus Total तुम्ही सर्च करत असलेल्या वेबसाइटचा यूआरएल स्कॅन करून ती वेबसाइट फेक आहे की नाही, हे सांगते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार
Mobile Use: मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया पहिल्या स्थानावर, भारताचा क्रमांक कितवा?