एक्स्प्लोर
399 रुपयात 90 जीबी डेटा, Vodafoneचा खास प्लॅन
व्होडाफोननं 399 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला तब्बल 90 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.
मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं आता नवा प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला जास्तीत जास्त डेटा मिळणार आहे. तसेच हा प्लॅन 6 महिन्यांपर्यंत वैध असणार आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आपल्या यूजर्ससाठी व्होडाफोननं 399 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला तब्बल 90 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.
व्होडाफोनचा 399 रुपयांचा प्लॅन आधीसुद्धा होता. मात्र,आता यामध्ये थोडेफार बदल करुन नवा प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनमुळे यूजर्सला अधिक दिवस डेटा वापरता येणार आहे.
दरम्यान, रिलायन्स जिओ 399 रुपयात 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. तर आता यावरच त्यांनी 100 टक्के कॅशबॅक ऑफरही आणली आहे. त्यालाच टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं ही ऑफर आणली आहे.
व्होडाफोनच्या या नव्या प्लॅननं रिलायन्स जिओ आणि एअरटेलला आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement