(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Elon Musk Twitter Deal : ट्विटरचं 'पाखरू' अखेर एलॉन मस्क यांच्या हाती; कराराबाबत 'या' 10 खास गोष्टी
Elon Musk Takeover Twitter : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. जाणून घ्या या करारासंबंधित काही महत्वाच्या गोष्टी काय आहेत.
Elon Musk Takover Twitter : मायक्रोब्लागिंग साईट ट्विटरला (Twitter) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी खरेदी केलं आहे. 44 अब्ज डॉलरमध्ये मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं आहे. यामुळे आता ट्विटर एक खासगी कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. ट्विटरच्या स्वतंत्र बोर्डाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, हा ट्विटरमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी सर्वोत्तम मार्ग आहे.
'या' करारातील महत्त्वाचे मुद्दे
एलॉन मस्क आणि ट्विटरमधील करारानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हा करार थोडक्यात समजून घेण्यासाठी खालील 10 मुद्दे महत्त्वाचे आहेत.
1. ट्विटरच्या (Twitter) संचालक मंडळाने एकमताने मंजूर केलेला हा करार 2022 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या करारानंतर, कंपनी आता एलॉन मस्कच्या संपूर्ण मालकीखाली येईल. मस्क यांनी ट्विटचे शेअर 54.20 डॉलर प्रति शेअरने खरेदी केले आहेत.
2. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर पहिलं ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, मुक्त भाष्य हा लोकशाहीचा आधार आहे. ट्विटर हा डिजिटल टाउन स्क्वेअर असून यामध्ये मानवाच्या भविष्यासाठीपासून मानवाधिकारापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली जाते.
3. एलॉन मस्क यांनी म्हटलं की, 'मला नवीन सुविधांसोबत कंपनीला पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे. मी ट्विटरला पहिल्यापेक्षा अधिक चांगलं बनवायचं आहे.'
4. मोठा संघर्ष आणि अनिश्चिततेनंतर हा करार करण्यात आली. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'ट्विटरचे सध्याचे कर्मचारी पहिल्याप्रमाणे काम करु शकतात. कंपनी मस्क यांच्या पूर्ण नियंत्रणात येईपर्यंत कुणालाही नोकरीवरून कमी केलं जाणार नाही.'
5. ट्विटरने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, एलॉन मस्क यांनी पूर्णपणे वचनबद्ध कर्ज आणि मार्जिन डेट फायनान्सिंगसाठी 25.5 अब्ज सुरक्षित केले आहेत. याव्यतिरिक्त, त्याने अंदाजे $21.0 बिलियनची इक्विटी वचनबद्धता देखील दिली आहे.
6. या महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच्या एका दिवसानंतर, ट्विटरने मर्यादित-मुदतीची शेअरहोल्डर हक्क योजना स्वीकारली. कंपनीची मालकी विरोधकांकडे जाण्यापासून टाळण्यासाठी अशा संरक्षण हालचाली करणं सामान्य आहे.
7. ही हक्क योजना गुंतवणूकदारांकडून वाजवी नियंत्रण प्रीमियम न भरता किंवा मंडळाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी पुरेसा वेळ न देता खुल्या बाजारातील संचयाद्वारे ट्विटरवर नियंत्रण मिळविण्याची शक्यता कमी करेल.
8. ट्विटर बोर्डाने ट्विटर विकत घेण्यासाठीची हक्क योजना अनपेक्षित आणि बंधनकारक नसलेल्या प्रस्तावानंतर स्वीकारली होती.
9. एलॉन मस्क त्याच्या व्यापक व्यावसायिक महत्त्वाकांक्षेसाठी ओळखले जातात. स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांनी गाठलेलं शिखर पाहून ही बाब लक्षात येते.
10. करार उघड होण्यापूर्वी एलॉन मस्कने ट्वीट केलं होतं की, 'मला आशा आहे की माझे सर्वात वाईट टीकादेखील ट्विटरवर कायम राहतील, कारण हाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Elon Musk Buy Twitter : एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक, 44 अब्ज डॉलरचा करार
- Trending News : आनंद महिंद्रांनी एलॉन मस्कना दाखवली 'भारतीय देशी टेस्ला', सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
- Rajasthan Temple Demolition : राजस्थानमधील पुरातन मंदिर पाडण्यावर सरकारची मोठी कारवाई, मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले 'हे' आदेश