Twitter : आता ट्विट 'एडिट' करता येणार? ट्विटरचं नवीन फिचर की 'एप्रिल फुल'; यूजर्स गोंधळात
Twitter Edit Feature : ट्विटरने 1 एप्रिलला ट्विट करत सांगितले की, ट्विटसाठी 'एडिट' पर्यायावर काम करत आहे. मात्र हे ट्विट म्हणजे 'एप्रिल फुल' तर नाही ना या विचाराने युजर्सना गोंधळात टाकले आहे.
Twitter Edit Feature : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) वापरणाऱ्या युजर्सना एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ट्विटर आता नवीन 'एडिट फिचर' (Edit Feature) वर काम करत आहे. ट्विटरने 1 एप्रिलला ट्विट करून या फिचरवर काम सुरु असल्याची माहिती दिली. मात्र ट्विटरच्या या ट्विटने युजर्सना गोंधळात टाकले आहे. त्याचे कारण म्हणजे 1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फुल डे' म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे ट्विटरच्या या ट्विटला यूजर्स 'एप्रिल फुल'चा विनोद मानत आहेत.
दरम्यान, ट्विटरने या प्रकरणावर विचित्र उत्तर दिले आहे आणि त्यामुळे यूजर्स आणखी गोंधळले आहेत. ट्विटरने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, 'आम्ही या माहितीला दुजोरा देऊ शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही, मात्र आम्ही आमचे विधाननंतर एडिट करू शकतो.' युजर्स एडिट फिचरची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की, ट्विटर एडिट फीचर आणणार नाही.
we are working on an edit button
— Twitter (@Twitter) April 1, 2022
कसं असेल 'एडिट फिचर'?
जर तुम्ही ट्विटर युजर असाल तर तुम्हाला हे माहितच असेल की ट्विटरवर ट्विट एडिट करण्याचा म्हणजेच दुरुस्त करण्याचा पर्याय नाही. मात्र संभाव्य एडिट फिचरमुळे युजर्सना केलेले ट्विट दुरुस्त करता येईल किंवा त्यामध्ये बदल करता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Supreme Court : अबब! केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित 35000 हून अधिक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
- Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha