Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
Odisha Delivery Boy Viral Video : एका व्हायरल व्हिडिओमध्ये ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये एक डिलिव्हरी बॉय एका मुलीला दिवसाढवळ्या बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Odisha Viral Video : ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये मंगळवारी एका फूड डिलिव्हरी बॉय तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रेमी युगलाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भगव्या रंगाच्या टी-शर्ट घातलेली व्यक्ती तरुणीला बेदम मारताना दिसत आहे. प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयने तरुणीला बेदम मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी पार्कमधून बाहेर तरुणीचा तिच्या प्रियकरासोबत जोरदार वाद झाला. व्हिडीओमध्ये ती तरुणीच्या प्रियकरासोबत भांडताना आणि त्याच्यावर दगडफेक करताना दिसत आहे. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणी आणखीनच संतप्त झाली आणि तिने व्हिडीओ बनवणाऱ्या एका व्यक्तीचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
Food Delivery boy who tried to intervene and pacify the matter, losses his cool after scolded by the girl, started beating the girl.
— Mohammad Suffian (@iamsuffian) March 31, 2022
Case registered against both parties#Odisha @aajtak @IndiaToday pic.twitter.com/DqINUglqH0
दरम्यान, एका फूड डिलिव्हरी बॉयने या प्रकरणात हस्तक्षेप करून भांडण करणाऱ्या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर भडकलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीला बेदम मारहाण केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 1 एप्रिलपासून बँकेचे नियम बदलणार, औषधं महागणार, जीएसटीतही बदल; जाणून घ्या काय आहेत 10 मोठे बदल
- April Fool's Day : 'एप्रिल फुल डे' साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या...
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)