Twitter : तुम्हाला आवडणारं कोणतंही ट्वीट बुकमार्क करा; कसं ते जाणून घ्या
Twitter Bookmark Feature : तुम्हाला आवडलेले ट्वीट तुम्ही आता सेव्ह करु शकता. बुकमार्क हा ऑप्शन वापरुन तुम्ही हे ट्वीट सेव्ह करु शकता.

Twitter Bookmark Feature : ट्विटर (Twitter) हा एक लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर या व्यासपीठावर लोक खुलेपणानं आपलं मत व्यक्त करतात. अशा परिस्थितीत काही लोकांचे ट्वीट युजर्स लाइक करतात. आता या ट्विट्सची संख्या कितीही असू शकते.
त्यामुळे एकाच वेळी सर्व आवडत्या ट्वीट्सचा मागोवा ठेवणं थोडं कठीण आहे. परंतु आपण आवडतं ट्वीट बुकमार्क करू शकलो तर? हे शक्य आहे. तुम्ही तुमचे आवडते ट्वीट बुकमार्क आणि सेव्ह करू शकता. या फिचरमुळे यूजर्स ट्वीट सेव्ह करू शकतात. कसं ते जाणून घ्या सविस्तर...
ट्वीट्स असे करा बुकमार्क
- तुमच्या iPhone किंवा Android स्मार्टफोनवर Twitter लॉग इन करा.
- जे ट्वीट तुम्हाला सेव्ह करायचं आहे किंवा फक्त बुकमार्क करायचं आहे, ते ओपन करा.
- ट्वीटच्या खाली असलेल्या शेअर आयकॉनवर टॅप करा.
- तुम्हाला आता अॅप्सच्या सूचीच्या अगदी वर बुकमार्क्स पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- एकदा तुम्ही ट्वीट बुकमार्क केल्यानंतर, तुम्हाला Twitter अॅपमध्ये एक सूचना मिळेल की, ट्वीट तुमच्या बुकमार्कमध्ये जोडले गेले आहे.
बुकमार्क ट्वीट कुठे दिसेल?
- तुमच्या iPhone किंवा Android स्मार्टफोनवर Twitter लॉग इन करा.
- नंतर बाजूच्या मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या प्रोफाइलवर क्लिक करा.
- आता बुकमार्क पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही बुकमार्क केलेल्या सर्व ट्वीटची यादी तुम्हाला पाहता येईल.
- येथे हे स्पष्ट करा की, हे ट्वीट तुम्ही काढून टाकेपर्यंत अॅपच्या बुकमार्क सेक्शनमध्ये राहतील. तुम्ही बुकमार्क केलेलं ट्वीट कमेंट, रिट्वीट, लाईक किंवा शेअर देखील करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
