एक्स्प्लोर

'हे' ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे! देतो वीज पडण्याचा इशारा

Damini App: लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता.

Damini App: लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच. यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.

मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. वीजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी दामिनी ॲप उपयोगी ठरत आहे. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था ( आयआयटीएम ) या संस्थेने हे ॲप विकसित केले आहे. ‘दामिनी’ ॲपसाठी आयआयटीएमने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क हे मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसविण्यात आले आहेत. या ॲपमुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे पंधरा मिनिट ते अर्धा तास आधी अचूक अंदाज मिळू शकतो. हे ॲप GPS लोकेशन ने काम करीत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राची दिशादर्शक स्थिती दर्शविण्यात येते. 

वीजा पडण्याची शक्यता तसेच वीज म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि वीजांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर सचित्र माहिती ‘दामिनी’ ॲपमध्ये देण्यात आली आहे. या ॲपवर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा वीजांच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळेल. त्यामुळे या माहितीचा आधारावर शेतकरी व नागरिक वेळीच सावध होऊन त्यांच्या जीव वाचवू शकतात. दरम्यान, गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ‘damini’ असं टाईप केल्यानंतर हे ॲप डाउनलोड करत येऊ शकत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget