सॅमसंगचा बहुप्रतिक्षित Galaxy M31s आज भारतात होणार लॉन्च; Realme X2 सोबत स्पर्धा
गेल्या अनेक दिवसांपासून Samsung Galaxy M31s या फोनच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सॅमसंग आपला हा नवा फोन भारतात लॉन्च करणार आहे. नवा स्मार्टफोन Galaxy M31s हा Galaxy M31 चा अपग्रेड वर्जन आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स एक फोन लॉन्च होण्याची वाट पाहत होते. आज तो फोन भारतात लॉन्च होणार आहे. तो फोन म्हणजे, Samsung Galaxy M31s. गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या या फोनच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सॅमसंग आपला नवा फोन Galaxy M31s भारतात लॉन्च करणार आहे. नवा स्मार्टफोन Galaxy M31s हा Galaxy M31 चा अपग्रेड वर्जन आहे. या नव्या फोनमध्ये सुपर एमोलेड डिस्प्लेसोबतच 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमधील फिचर्ज जाणून घेऊया...
Samsung च्या लॉन्च होणाऱ्या नव्या Galaxy M31s फोनचा टीझर Amazon वर रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून या फोनची चर्चा युजर्समध्ये होत आहे. या फोनसाठी Amazonच्या वेबसाईटने एक मायक्रो साइट तयार केली आहे. जिथे या नव्या स्मार्टफोनबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता हा फोन ऑनलाईन लॉन्च करण्यात येणार आहे. Samsung ने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये Galaxy M31 लॉन्च केला होता. या फोनला युजर्सची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं. आता कंपनी या नव्या फोनला Galaxy M31 पेक्षा नव्या फिचर्ससह लॉन्च करणार आहे.
स्पेसिफिकेशंस
नव्या Galaxy M31sमध्ये 6000mAh बॅटरीची क्षणता देण्यात आली आहे. नवा फोन Android 10 आणि One UI 2.0 वर काम करणार आहे. यामध्ये देण्यात आलेली बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये 64 मेगाफिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, Galaxy M31मध्येही हेच फिचर्स देण्यात आले आहेत. नव्या फोनच्या डिझाइनमध्ये कदाचित काही बदल पाहायला मिळतील. नव्या गॅलक्सी एम31एस ची किंमत 18 हजार रुपयांपासून सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Realme X2 शी स्पर्धा
नव्या Galaxy M31s ची स्पर्धा Realme X2 शी होऊ शकते. या फोनची किंमत 16999 रुपयांपासून सुरु होते. परफॉरमन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 6.5 इंचाच्या S-AMOLED डिस्प्ले सोबतच 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन फुल HD+ रेजॉलूशन देते. याचसोबत यामध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.
फोनमध्ये 4,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 50W SuperVooC फ्लॅश चार्ज टेक्नॉलजीला सपोर्ट करते. अशातच भारतातील सर्वात वेगाने चार्ज होणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये UFS 3.0 स्टोरेज देण्यात आलं आहे. फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+2 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा क्वाड रिययर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
OnePlus Nord भारतात लॉन्च; 'या' दिवसापासून विक्रीसाठी उपलब्ध
चीनला दणका; भारतात iphone 11 चं उत्पादन सुरु, किमतीही कमी होण्याची शक्यता
Apple लॉन्च करू शकतं फोल्डेबल आयफोन; जाणून घ्या काय असू शकते किंमत?
Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग