Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग
रिलायन्सच्या वार्षिक बैठकीदरम्यान, Jio Glass आणि JioTV+ ची घोषणा करण्यात आली. Jio Glass एक मिक्स्ड रियालिटी स्मार्ट ग्लास आहे. या ग्लासमध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधाही देण्यात येणार आहे.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेडच्या 43व्या वार्षिक बैठकीत Annual general meeting (AGM) रिलायन्स जियोने ' Jio Glass'ची घोषणा केली. दरम्यान, Jio Glass एक मिक्स्ड रियालिटी स्मार्ट ग्लास आहे. या ग्लासमध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधाही देण्यात येणार आहे. जियो ग्लासमध्ये वर्च्युअल असिस्टंटचाही सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने Jio Glass ला खासकरून होलोग्राम कंटेंटसाठी सादर केलं आहे. केबलच्या मदतीने जियो ग्लास स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. या डिवाइसचं वजन साधारणतः 75 ग्राम असणार असल्याचंही एजीएममध्ये सांगण्यात आलं.
Jio Glass चे फीचर्स
रिलायन्सच्या वार्षिक बैठकीदरम्यान, कंपनीने जियो ग्लासचा डेमोही दाखवला. जियो ग्लासमार्फत तुम्ही बोलून एकाचवेळी दोन लोकांना व्हिडीओ कॉल करू शकता. युजर्सना हायएस्ट क्लास व्हिज्युअल एक्सपिरियंस देण्यासाठी कंपनीने जियो ग्लास तयार केल्याचं सांगितलं. जियोचं हे स्मार्ट ग्लास, 3D होलोग्राफिक व्हिडीओ कॉल सपोर्टसोबत युजर्सना मिळणार आहे. व्हिडीओ कॉलच्या वेळी समोरील व्यक्तीला 3D रूपात पाहाता येणार आहे. दरम्यान, Jio Glass 25 अॅप्लिकेशन्सला सपोर्ट करतं.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप JioMeet
43व्या वार्षिक बैठकीत Annual general meeting (AGM) बोलताना ईशा अंबानी यांनी सांगितले की, JioMeet हे एक सर्वात स्वस्त आणि अत्यंत सुरक्षित व्हिडीओ कॉन्फरन्सिग अॅप आहे. हे दररोजच्या जीवनातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, JioMeet ला 50 लाख लोकांनी डाऊनलोड केलं आहे. दरम्यान, जियोमीट हे व्हिडीओ मिटिंग अॅप असून काही दिवसांपूर्वीच हे लॉन्च करण्यात आलं आहे. JioMeet एक क्लाउड आधारित वीडियो कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म आहे.
JioTV+
जियोच्या वार्षिक बैठकीत JioTV+ चीदेखील घोषणा करण्यात आली. या सर्विसमार्फत कंपनी आपल्या युजर्सचा टीव्ही पाहण्याचा अंदाज बदलणार आहे. हा टीव्ही एका खास टेक्नॉलॉजीवर काम करतो. यामध्ये देण्यात आलेल्या जियो रिमोटमार्फत तुम्ही तुमचे आवडते प्रोग्राम अगदी सहज सर्च करू शकता. जियो टीव्हीमध्ये प्रत्येक जॉनरचे प्रोग्राम पाहता येणार आहेत. तसेच व्हॉइस कमांड देऊनही तुम्ही तुमच्या आवडीचे प्रोग्राम सर्च करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
RIL AGM 2020 : गुगल जिओमध्ये 33,737 कोटी गुंतवणार, वाचा 10 मोठ्या घोषणा