(Source: ECI/ABP News/ABP Majha)
One Plus Nord स्मार्टफोन 4 ऑगस्टपासून 'या' प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध; सॅमसंग गॅलक्सी M31s सोबत टक्कर
वनप्लस नॉर्ड कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असण्यासोबतच 5जी सपोर्टेबल असणार आहे. आतापर्यंतच्या स्मार्टफोन्सपैकी हा देशातील सर्वात कमी किमतीचा 5जी सपोर्टेबल स्मार्टफोन आहे.
मुंबई : वन प्लसचा बजेट फोन OnePlus Nord भारतात लॉन्च झाला असून 4 ऑगस्टपासून अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर ओपन सेलमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन फक्त प्री बुकिंग केलेल्या ग्राहकांना मिळणार होता, आता हा सर्व प्री बुकिंगशिवायही खरेदी करता येणार आहे. OnePlus Nord च्या 8GB आणि 12GB रॅम व्हेरियंटची विक्री अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या साइटवर चार ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच या स्मार्टफोनचा 6 GB रॅम असणारा स्मार्टफोन सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या मार्केटमध्ये वनप्लस नॉर्डची थेट स्पर्धा सॅमसंग गॅलेक्सी M31s सोबत होणार आहे.
वनप्लस नॉर्ड कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असण्यासोबतच 5जी सपोर्टेबल असणार आहे. आतापर्यंतच्या स्मार्टफोन्सपैकी हा देशातील सर्वात कमी किमतीचा 5जी सपोर्टेबल स्मार्टफोन आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी वनप्लस नॉर्डमध्ये फास्ट आणि स्मूथ एक्सपिरियन्ससाठी 300 ऑप्टिमायजेशन केले आहेत. भारतात वन प्लस नॉर्डची किंमत 24,999 रुपयांनी सुरु होऊ शकते. 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी 24,999 तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी 27,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी 29,999 रुपये मोजावे लागू शकतात.
व्हेरियंट्स, किंमत आणि सेल
OnePlus Nord च्या 8GB आणि 12GB रॅम व्हेरियंटची विक्री अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या साइटवर चार ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच या स्मार्टफोनचा 6 GB रॅम असणारा स्मार्टफोन सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
OnePlus Nord मध्ये 6.44 इंच फुल एचडी प्लस फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट इतका आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरासेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल प्राइम कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ लेंस असणार आहे. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी याच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
अर्ध्या तासात 70 टक्के चार्ज
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. पावरसाठी या फोनमध्ये 4115mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30T फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फक्त 30 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन 70 टक्के चार्ज होतो. कनेक्टिविटीसाठी हा फोन 4G व्यतिरिक्त 5G ला सपोर्ट करणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी M31s सोबत स्पर्धा
वन प्लसची थेट स्पर्धा सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन M31s सोबत असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स एक फोन लॉन्च होण्याची वाट पाहत होते. अखेर हा फोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नवा स्मार्टफोन Galaxy M31s हा Galaxy M31 चा अपग्रेड वर्जन आहे. या नव्या फोनमध्ये सुपर एमोलेड डिस्प्लेसोबतच 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.
नव्या Galaxy M31sमध्ये 6000mAh बॅटरीची क्षणता देण्यात आली आहे. नवा फोन Android 10 आणि One UI 2.0 वर काम करणार आहे. यामध्ये देण्यात आलेली बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये 64 मेगाफिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, Galaxy M31मध्येही हेच फिचर्स देण्यात आले आहेत. नव्या फोनच्या डिझाइनमध्ये कदाचित काही बदल पाहायला मिळतील. नव्या गॅलक्सी एम31एस ची किंमत 18 हजार रुपयांपासून सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सॅमसंगचा बहुप्रतिक्षित Galaxy M31s आज भारतात होणार लॉन्च; Realme X2 सोबत स्पर्धा
- OnePlus Nord भारतात लॉन्च; 'या' दिवसापासून विक्रीसाठी उपलब्ध
- चीनला दणका; भारतात iphone 11 चं उत्पादन सुरु, किमतीही कमी होण्याची शक्यता
- Apple लॉन्च करू शकतं फोल्डेबल आयफोन; जाणून घ्या काय असू शकते किंमत?
- Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग