जबरदस्त फिचर्ससोबत Moto G9 आज भारतात लॉन्च होण्याची शक्यता; 'या' फोनसोबत स्पर्धा
मोटोरोला इंडियाने ट्विटरवर एक टीझर लॉन्च केला होता. ज्याची लिंक कंपनीने फ्लिपकार्ट टीझर पेजवर शेअर केली होती. या लिंकमध्ये सांगण्यात आलं आहे की, पुढच्या आठवड्यात एक नवा फोन कंपनी लॉन्च करणार आहे.
मुंबई : मोटोरोला आज आपला नवा स्मार्टफोन Moto G9 भारतात लॉन्च करु शकते. काही दिवसांपूर्वी कंपनीने या फोनचा टीझर लॉन्च केला होता. त्यानंतर असा अंदाज लावण्यात येत आहे की, लवकरच हा फोन भारतात लॉन्च होऊ शकतो. असं बोललं जात आहे की, आज 12 वाजता हा फोन फ्लिपकार्टसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लॉन्च करण्यात येईल.
टीझर झाला होता लॉन्च
मोटोरोला इंडियाने ट्विटरवर एक टीझर लॉन्च केला होता. ज्याची लिंक कंपनीने फ्लिपकार्ट टीझर पेजवर शेअर केली होती. या लिंकमध्ये सांगण्यात आलं आहे की, पुढच्या आठवड्यात एक नवा फोन कंपनी लॉन्च करणार आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की, मोटो G9 सोबत मोटो G9 प्लस आणि मोटो G9 प्ले देखील लॉन्च होणार की, नाही. परंतु, अशी चर्चा आहे की, कंपनी हा फोन मीड रेंजमध्ये लॉन्च करणार आहे.
Gear up to be the conquerer of day and night with a power-packed battery! Unveiling on 24th August, 12 PM. Stay tuned! https://t.co/3J5fMvgfOF pic.twitter.com/w8xOZJWSxK
— Motorola India (@motorolaindia) August 23, 2020
Moto G9 मध्ये असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स
Moto G9च्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाले तर टीझरमध्ये सांगितल्यानुसार, या फोनमध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा फिचर्स आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, या फोनमध्ये देण्यात आलेल्या फिचर्सचा उपयोग करून युजर्सना कमी लाईटमध्येही उत्तम फोटो काढता येऊ शकतात. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. मोटो जी9 मध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉच असू शकते. तसेच या फोनमध्ये काही बेझल्सही दिले जाऊ शकतात.
Get ready to bring your entertainment to life. Unveiling tomorrow at 12 PM on @Flipkart. Stay tuned! https://t.co/XR6XoTXZUf pic.twitter.com/db7xnc29jo
— Motorola India (@motorolaindia) August 23, 2020
Poco M2 प्रो सोबत असणार टक्कर
मोटो G9 ची टक्कर पोको M2 प्रो सोबत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन असणारा आयपीएस एससीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पोको M2 प्रो स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. तर 6GB रॅमच्या व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपयांना उपलब्ध आहे. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Xiaomi भारतात लवकरच लॉन्च करणार स्वस्तात मस्त Redmi 9 स्मार्टफोन
- WhatsApp वर एकाच वेळी 50 लोकांना व्हिडीओ कॉल शक्य; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
- भारतात पुढील महिन्यात 5G सर्विसचं ट्रायल सुरु होण्याची शक्यता; चिनी कंपन्यांना परवानगी नाही
- सावधान...! ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्सचा वापर घातक
- Jio-Airtel-Vodafone चे 'हे' स्वस्तात मस्त प्लान; युजर्ससाठी अनेक सुविधा