iPhone 14 सीरीजचे हे फीचर Samsung Galaxy S23 सिरीजमध्ये मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Samsung Galaxy S23: ताज्या मीडिया रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग आपल्या आगामी Samsung Galaxy S23 सीरीजमध्ये iPhone 14 सीरीजचे एक फीचर ऑफर करणार आहे.
Samsung Galaxy S23: अॅपलचे (Apple) स्मार्टफोन (iPhone) जगभरात लोकप्रिय आहेत. याचे कारण म्हणजे त्यांची खास वैशिष्ट्ये. ताज्या रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग कंपनी आपल्या स्मार्टफोन्समध्ये Apple चे काही खास फीचर्स आणत आहे. या रिपोर्ट्समध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, सॅमसंग कंपनी आपल्या आगामी Samsung Galaxy S23 सीरीज Apple प्रमाणेच एक खास फीचर देणार आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन असे या फीचरचे नाव आहे. या फीचरद्वारे यूजर्स नेटवर्क नसलेल्या भागातही आपत्कालीन कॉल करू शकतील. याशी संबंधित माहिती जाणून घ्या
सॅमसंग फोनमध्ये Apple प्रमाणेच एक खास फीचर
ताज्या मीडिया रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग आपल्या आगामी Samsung Galaxy S23 सीरीजमध्ये iPhone 14 सीरीजचे युनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन (युनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन) फीचर ऑफर करणार आहे. या खास फीचरसाठी सॅमसंग कंपनीने इरिडियम कम्युनिकेशन्ससोबत भागीदारी केल्याचे वृत्त आहे. इरिडियम कम्युनिकेशन्स कंपनी 66 लो-ऑर्बिट उपग्रहांद्वारे व्हॉइस कॉलिंग आणि डेटा कम्युनिकेशन सेवा प्रदान करते.
सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी
दुसरीकडे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसाठी अॅपल कंपनी ग्लोबल स्टार कंपनीसोबत काम करत आहे. Apple आणि Samsung व्यतिरिक्त चीनी कंपनी Huawei ने देखील काही काळापूर्वी या फीचरवर काम केले आहे. चीनी कंपनीने आपल्या नव्या Mate 50 आणि Mate 50 Pro स्मार्टफोनमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर दिले आहे. या वैशिष्ट्यासाठी Huawei ने Beidou उपग्रहाचा वापर केला.
हे फीचर अमेरिका आणि कॅनडापुरते मर्यादित आहे
सॅमसंग आपल्या आगामी Samsung Galaxy S23 सीरीजमध्ये iPhone 14 सीरीजचे युनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचर ऑफर करणार आहे. तर अशीही बातमी आहे की आयफोन 14 सीरीजसह येणारे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सध्या फक्त यूएस आणि कॅनडामधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तथापि, असे अहवाल प्राप्त होत आहेत की Apple लवकरच हे वैशिष्ट्य इतर देशांमध्ये देखील आणण्याची तयारी करत आहे. सॅमसंगचे सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचर कॉल तसेच टेक्स्ट मेसेजिंग आणि लो-रिझोल्युशन इमेज शेअर करण्यास अनुमती देईल असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी
भारत, रशिया, अमेरिकेसह 84 देशांतील 50 कोटी Whatsapp युजर्सचा डेटा लीक; खासगी माहितीची ऑनलाईन विक्री