एक्स्प्लोर

भारत, रशिया, अमेरिकेसह 84 देशांतील 50 कोटी Whatsapp युजर्सचा डेटा लीक; खासगी माहितीची ऑनलाईन विक्री

Whatsapp Data Leak: भारत, रशिया, अमेरिकेसह 84 देशांतील 50 कोटी Whatsapp युजर्सचा डेटा लीक झाल्याचं सायबर न्यूजच्या अहवालातून स्पष्ट.

Whatsapp Data Leak: सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यातल्या त्यात व्हॉट्सअॅप (Whatsapp), याशिवाय आपलं कामच होऊ शकत नाही. पण याचसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 500 दक्षलक्ष व्हॉट्सअॅप युजर्सचे फोन नंबर लीक (Whatsapp Users Data Leak) झाले असून ते ऑनलाईन विकले जात आहेत. एका सायबर न्यूजच्या रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डाटा ब्रीचपैकी एक आहे. 

सायबर न्यूजच्या (Cyber News) अहवालानुसार, एका लोकप्रिय हॅकिंग फोरमवर विक्रीसाठी डेटाबेसमध्ये 84 देशांतील व्हॉट्सअॅप युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. डेटा विकणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, सेटमध्ये एकट्या यूएसमधील 32 दशलक्ष युजर्सच्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे. याशिवाय इजिप्त, इटली, फ्रान्स, यूके, रशिया आणि भारतातील लाखो युजर्सचा डेटाही लीक झाला असून, त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे.

7 हजार डॉलर्समध्ये मिळतोय अमेरिकेचा डेटासेट, तर भारताचा... 

सायबर न्यूजच्या अहवालानुसार, यूएस डेटासेट 7000 डॉलर्समध्ये उपलब्ध आहे, तर यूके डेटासेटची किंमत 2500 डॉलर्स इतकी आहे. सायबर न्यूजनं सांगितलं की, डेटा विकणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी पुरावा म्हणून 1097 क्रमांक शेअर केले. सायबर न्यूजनं हे सर्व नंबर तपासले आणि ते सर्व व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे असल्याचं आढळून आलं. दरम्यान, हॅकरनं डेटा कसा मिळवला, हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही. 

अशा माहितीचा वापर ऑनलाइन फसवणुकीत केला जातो

अशी माहिती अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाते जसे की स्मिशिंग आणि विशिंग, ज्यामध्ये वापरकर्त्यांना मजकूर संदेश पाठवणे आणि त्यांना लिंकवर क्लिक करण्यास सांगणे समाविष्ट असते. त्यानंतर वापरकर्त्याला त्यांचे क्रेडिट कार्ड किंवा इतर वैयक्तिक तपशील प्रदान करण्यास सांगितले जाते.

ऑनलाईन फ्रॉडसाठी वापरला जातो युजर्सचा डेटा 

असा डेटा अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरला जातो. जसं की, स्मिशिंग आणि विशिंग. ज्यामध्ये युजर्सना मेसेज पाठवून त्यातील लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर युजर्सना त्यांचं क्रेडिट कार्ड किंवा इतर व्यक्तिगत तपशील प्रदान करण्यासही सांगितलं जातं. 

गेल्या वर्षीही झाला होता डेटा लीक 

मेटाच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवर डेटा ब्रीच होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्यावर्षीही भारतातील 6 मिलियन रेकॉर्डसह 500 मिलियनहून अधिक फेसबुक युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. लीक झालेल्या डेटामध्ये फोन नंबर आणि इतर माहितीचा समावेश होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget