एक्स्प्लोर
Advertisement
True Voter : राज्य निवडणूक आयोगाचं खास अॅप
मुंबई : निवडणूक आयोगाने मतदारांना सर्व माहिती एका क्लिकवर देण्यासाठी True Voter हे अॅप लाँच केलं आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यानही या अॅपचा वापर करण्यात आला असून निवडणूक आयोगाला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
True Voter अॅप नागरीक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे. या अॅपचे मुख्य कार्य मतदारांना यादीतील नावाचा शोध उपलब्ध करून देणे आहे.
गुगल प्ले स्टोअरवरुन स्मार्टफोन युझर्स हे अॅप डाऊनलोड करु शकतात. या अॅपमुळे मतदार, उमेदवार आणि अधिकारी या सर्वांनाच मोठा फायदा होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये या अॅपचा फायदा होणार आहे.
मतदारांसाठी सुविधा :
- मतदारांना आपल्या मतदान कार्ड, मतदार संघ यांविषयी संपूर्ण माहिती मिळेल.
- गुगल मॅपच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत जाता येईल.
- प्रभागात निवडणुका लढविणाऱ्या उमेदारांचा संपूर्ण तपशील माहिती करुन घेता येईल.
- मतदारांच्या अपेक्षा आणि प्रभागातील अडचणी उमेदवारांपर्यंत पोहोचविणे
- मतदान केंद्रनिहाय मतदार यादी
- मतदानाबाबतची माहिती मिळवता येईल.
- निवडणुकीचा निकाल पाहता येईल.
- स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करता येईल.
- आधार, मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी अद्ययावत करता येईल.
- गैरहजर, स्थलांतरित, मयत आणि बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळवता येईल.
- स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाव्दारे सुरक्षित करता येईल.
- आपत्कालिन परिस्थितीत तातडीचे संपर्क जतन करता येतील.
- एकाच मोबाईलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य
- अधिकाऱ्यांच्या नोंदणीमध्ये अधिकारी/कर्मचारी यांचे Hierarchical Structure तयार करणे
- सोप्या आणि अचूक पध्दतीने मतदार यादी तयार कण्याकरिता कंट्रोल चार्ट तयार करणे
- मतदान केंद्राचे ठिकाण गुगलवर चिन्हांकित करणे
- आयोग, आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे त्यांचे संदेश थेट नोंदणी झालेल्या मतदारांना पाठविणे
- मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्राचा दोन तासांचा अहवाल पाठविणे
- राज्य निवडणूक आयोग ते मतदान केंद्राध्यक्ष या निवडणूक यंत्रणेमध्ये सोप्या संभाषणाचे माध्यम देणे
- मतमोजणी आणि निकालाची माहिती मतदारांसाठी टाकणे
- निवडणुकीचा खर्च ऑनलाईन देणे, दैनंदिन खर्चाचा आणि एकूण खर्चाचा अहवाल आणि प्रतिज्ञापत्र मिळविणे
- स्वत:चा वैयक्तिक तपशील आणि केलेल्या कामगिरीची माहिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी असलेले स्वप्न मतदारांपर्यंत पोहोचविणे
- मतदान केंद्रनिहाय यादी मिळविणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement