एक्स्प्लोर
केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोट, फेसबुकचं सॅटेलाईट उद्ध्वस्त

फ्लोरिडा : अमेरिकेमधील फ्लोरिडा राज्यातील केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोटा झाला असून, यात फेसबुकचं एक कम्युनिकेशन सॅटेलाईट उद्ध्वस्त झालं आहे. स्पेस एक्स कंपनी रॉकेट लॉन्च करताना लॉन्च पॅडवर हा स्फोट झाला आहे. स्पेस एक्स कंपनीच्या माहितीनुसार, सोशल मीडिया वेबसीट फेबसुकचं कम्युनिकेशन सॅटेलाईट शनिवारी लटन्त केलं जाणार होतं. मात्र, या स्फोटात सॅटेलाईट पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. यूटेलसॅट कम्युनिकेशन्ससोबतच्या भागिदारीमध्ये फेसबुक ईस्राइलमध्ये बनवण्यात आलेल्या एमॉस-6 उपग्रहाचा वापर करण्यात आले होते. एमॉस-6 उपग्रहाच्या मदतीने सर्व आफ्रिकन देशांमधील नागरिकांना फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआरजीच्या माध्यमातून ब्रॉडब्रँड इंटरनेट देण्याची योजना होती. केनेडी स्पेस सेंटरमधील स्फोटाचा परिणाम दूरवर झाला. स्पेस एक्सच्या माहितीनुसार, रॉकेटमध्ये इंधन भरताना चूक झाल्याने स्फोट झाला. सुदैवाने, या स्फोटात कुणीही जखमी झालं नाही, अशी माहिती मिळते आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, एमॉस-6 उपग्रहाची किंमत जवळपास 20 कोटी डॉलर एवढी होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























