नेमकं काय बिघडलेलं; Myntraचा नवा लोगो पाहून नेटकरी गोंधळले
महिलांच्या दृष्टीनं हा लोगो आक्षेपार्ह असल्याचं कारण पुढे करत या लोगोसंदर्भातील एक तक्रार एका महिलेनं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये दाखल केली होती.
मुंबई : ई- कॉमर्स साईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिंत्रा (Myntra) या शॉपिंग साईटनं त्यांच्या लोगोबाबत एक नवा आणि मोठा निर्णय घेतला. हा निर्णय मोठा ठरला कारण एका नव्या रुपानंच मिंत्रा सर्वांसमोर येणार होतं. महिलांच्या दृष्टीनं हा लोगो आक्षेपार्ह असल्याचं कारण पुढे करत या लोगोसंदर्भातील एक तक्रार एका महिलेनं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये दाखल केली होती. ज्यामुळंच मिंत्राकडून कंपनीचा लोगो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवा लोगो मिंत्राकडून लाँच करताच सोशल मीडियावर याबाबतच्या असंख्य चर्चांनी जोर धरला. मिंत्राचा लोगो बदलला असता तरीही प्रथमदर्शनी नेमकं काय बदललं आहे असाच प्रश्न अनेकांपुढे उभा राहतो. पण, लोगो निरखून पाहिल्यास यामध्ये रंगतसंगतीत काही बदल केल्याचं लक्षात येत आहे. हा फारसा मोठा बदल नाही, त्यामुळं हीच बाब हेरत नेटकऱ्यांनी मिंत्राच्या नव्या लोगोाबाबत काही विनोदी मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर मीम्स शेअर करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातच या मंडळींना मिंत्राच्या लोगोच्या निमित्तानं आयता विषयच मिळाला. ज्या धर्तीवर या लोकप्रिय ई- कॉमर्स साईटची जोरदार खिल्ली उडवण्यात आली. नेमकं काय बिघडलं होत, लोको की लोकांची विचार करण्याची क्षमता? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर, पाहा कसं वेडं बनवलं... असं म्हणत काही नेटकऱ्यांनी हे लोगो बदलण्याचं प्रकरणी सर्वांपुढे आणलं.
After Myntra's logo change, wondering what's dirtier? The logo or Logo ki soch. #MyntraLogo
— Muskan (@Muskan1804) January 30, 2021
All the logo maker who have done studies to make logos. Now they to rethink about there ideas.#MyntraLogo pic.twitter.com/k0zeKwnIBG
— Pooja Mourya (@PoojaMourya07) January 30, 2021
#MyntraLogo After changing the logo : pic.twitter.com/hh0Y5PJhAF
— Dheeraj (@blacklisted_x3) January 30, 2021
नेमकं प्रकरण काय?
अवेस्ता फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या नाज पटेल यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सदर प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. मिंत्रानं लोगो हटवावा आणि या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली होती. ज्यानंतर लोगोबाबत कंपनीनं हा निर्णय़ घेतला. कंपनीच्या सांगण्यानुसार संकेतस्थळ आणि अॅपवरही हे बदल लवकरत दिसून येणार आहेत. पॅकेजिंग मटेरियलवरही लोगो बदलण्यात येणार असून, नव्या लोगोच्या छपाईसाठी नव्यानं पॅकेजिंग मटेरियल पाठवण्यात आलं आहे असंही मिंत्राकडून सांगण्यात आलं आहे.