सॅमसंगने लॉन्च केले नवीन स्मार्ट वॉच, मिळणार 'हे' फीचर्स
Samsung Galaxy Watch5: तुम्ही सर्वात चांगली Android स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, नुकतीच लॉन्च झालेली Samsung Galaxy Watch 5 हा देखील तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकतो.

Samsung Galaxy Watch5: तुम्ही सर्वात चांगली Android स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, नुकतीच लॉन्च झालेली Samsung Galaxy Watch 5 हा देखील तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकतो. या सिरीजमध्ये तीन वॉच लॉन्च करण्यात आल्या आहेत. ज्यांची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरू होते. या वॉचमध्ये गुलाबी, निळा, राखाडी, जांभळा, काळा असे 7 रंग पर्याय आहेत. ही स्मार्ट वॉच अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहेत. ही दिसण्यात खूप आलिशान आणि डिझाइनमध्ये खूप मजबूत आहे.
1-Samsung Galaxy Watch5 Bluetooth (44 mm, Graphite, Compatible with Android only)
- ही सॅमसंगची नवीन वॉच असून यात सुधारित स्लीप तंत्रज्ञान दिले आहे. जे झोपण्याच्या पद्धती चांगल्या प्रकारे ट्रक करते. यामध्ये तुम्ही झोपण्याच्या वेळेचे नियोजन करू शकता. तुम्ही घोरत असल्यास ही वॉच तेही ट्रक करते. तसेच तुम्ही किती वेळ आणि किती चांगली झोप घेतली याची माहिती तुम्हाला ही वॉच देऊ शकते.
- यामध्ये तुम्ही BIA (Body Composition Analysis) पाहू शकता. ज्यामध्ये शरीरात फॅट्स आणि स्नायूंचे वजन किती आहे हे कळेल.
- यामध्ये हृदय गती सेन्सर आहे. जो तुमच्या हृदयाच्या गतीचे योग्यरित्या निरीक्षण करून तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर अपडेट ठेवेल.
- यात 90 व्यायामांचा ट्रॅक आहे, ज्यापैकी तुम्ही कोणताही वर्कआऊट केलात तर त्याच्या शारीरिक हालचालींचा तपशील येईल.
- यात सॅफायर क्रिस्टल डिस्प्ले आहे. याची स्क्रीन खूप मजबूत आहे आणि ती लवकर स्क्रॅच होणार नाही.
या सिरींजमधील ही सर्वात महागडी महागडे स्मार्ट वॉच आहे. या स्मार्ट वॉचची किंमत 48,999 रुपये आहे. परंतु डीलमध्ये तुम्ही 44,999 रुपयांमध्ये 8% कमी प्रीबुक करू शकता. या वॉचमध्ये 45 मिमी बँडचा पर्याय आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
