Samsung Galaxy A23 5G लॉन्च; मिळेल 50MP कॅमेरा, जाणून घ्या फीचर्स
Samsung Galaxy A23 5G Launch: दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A23 5G लॉन्च केला आहे.
Samsung Galaxy A23 5G Launch: दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A23 5G लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A23 5G सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यातूनच याचे स्पेसिफिकेशन्स आणि लूक बद्दल माहिती समोर आली आहेत. फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे. Samsung Galaxy A23 5G च्या फीचर्स आणि किंमतीबद्दल स्पेसिफिकेशन्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Samsung Galaxy A23 5G चे स्पेसिफिकेशन्स
- Samsung Galaxy A23 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो.
- Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
- Samsung Galaxy A23 5G Android 12 वर आधारित One UI 4.1 सह येतो.
- Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये 8 GB पर्यंत RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
- Samsung Galaxy A23 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- कनेक्टिव्हिटीसाठी Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये ब्लूटूथ v5.1 आणि ड्युअल-बँड वायफाय आहे.
- Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये गायरो सेन्सर, एक्सीलरोमीटर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, ग्रिप सेन्सर, व्हर्च्युअल लाइटिंग सेन्सर आणि व्हर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर आहेत.
- Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
किंमत
सॅमसंगने जारी केलेल्या फोटोनुसार, Galaxy A23 5G गुलाबी, निळा, पांढरा आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगने अद्याप फोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. हा फोन Samsung Galaxy A22 5G च्या किंमतीच्या जवळपास असेल, असा अंदाज आहे. Galaxy A22 5G फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये सादर करण्यात आला होता. याच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :