Twitter : ट्विटरच्या सुरक्षेला सुरंग! 54 लाख युजर्सचा डेटा लीक, अकाऊंट होल्डर्सला दिली माहिती
Twitter Reports Security Flaw : ट्विटरवरील 54 लाख युजर्सची माहिती चोरी झाली आहे. ट्विटरला याबाबत माहिती मिळताच ट्विटरने युजर्सला याबाबत माहिती देत चूक सुधारली आहे.
Twitter Reports Security Flaw : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या (Twitter) सुरक्षेला सुरंग (Twitter Security Breach) लागला आहे. ट्विटरवरून लाखो युजर्सला डेटा लीक झाल्याचं समोर आलं आहे. ट्विटवरून सुमारे 54 लाख युजर्सची माहिती चोरी झाली आहे. यानंतर ट्विटरवने आपली चूक सुधारत अकाऊंट युजर्सला याबाबत माहिती दिली. जानेवारी 2022 मध्ये सुमारे 54 लाख अकाऊंट होल्डर्सचा डेटा चोरी झाल्याचं ट्विटर कंपनीनं सांगितलं आहे.
ई-मेल आणि मोबाईल नंबरचा डेटा लीक
ट्विटर कंपनीने निवेदनात म्हटंल आहे की,' जानेवारी 2022 मध्ये ट्विटरच्या बग बाऊंटी प्रोग्राम (Bug Bounty Program) यामुळे ट्विटरच्या सिस्टिममध्ये त्रुटी आढळून आली. यामुळे युजर्स ट्विटरवरील डेटा लीक झाल्याचं समोर आलं आहे. या त्रुटीमुळे ट्विटर अकाऊंट होल्डरच्या ई-मेल (Email) आणि मोबाईल नंबर (Mobile Number) इत्यादी माहिती चोरीला गेली. या त्रुटीबाबत समजताच ही दूर करण्यात आली आहे.'
54 लाख युजर्सच्या अकाऊंटवरील माहिती चोरीला
ट्विटरच्या कंपनीने सांगितलं आहे की, 'जुलै 2022 मध्ये कंपनीला एका प्रेस रिपोर्टद्वारे कळले की कोणीतरी ट्विटरमधील त्रुटीचा संभाव्य फायदा घेतला जात आहे. हॅकर्सने 54 लाख अकाऊंट होल्डर्सची माहिती गोळा करत विकण्याचा प्रयत्न केला. विक्रीसाठी उपलब्ध डेटा आणि नमुनाचं पुनरावलोकन केल्यानंतर ट्विटरने ही समस्या दूर केली.'
काय होती ट्विटरमधील त्रुटी?
ट्विटर अॅपमध्ये मित्रपरिवाराशी किंवा संपर्कातील व्यक्तीसोबत कनेक्शन करण्यासाठी मदत करण्यास डिझाइन केलेलं Twitter Tools वापरून, तुम्ही वेबवरील कोणत्याही फोन नंबर किंवा ईमेल पत्त्याशी लिंक केलेल्या Twitter अकाऊंटवर पाहू शकता. या अकाऊंचा डेटाबेस तयार करुन हा डेटा लीक करण्यात आला. त्यामुळे सध्या ट्विटरने ही चूक सुधारली आहे.