Watch : Apple Watch सारखे हुबेहूब दिसणारे Bluei TORSO भारतात लॉन्च; किंमत 3 हजारांहूनही कमी
Bluei TORSO Launch : भारतीय कंपनी Bluei ने आपले नवीन स्मार्टवॉच Bluei TORSO लॉन्च केले आहे. Bluei TORSO सह ब्लूटूथ कॉलिंगचे फीचर देण्यात आले आहे.
Bluei TORSO Launch : भारतीय कंपनी Bluei ने आपले नवीन स्मार्टवॉच (Smartwatch) Bluei TORSO लॉन्च केले आहे. Bluei TORSO सह ब्लूटूथ कॉलिंगचे फीचर देण्यात आले आहे. TORSO हे कंपनीचे पहिले असे स्मार्टवॉच आहे ज्यामध्ये कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या घड्याळाच्या रचनेपासून ते फिचर्सपर्यंत अनेक गोष्टी अॅपल वॉचसारख्याच आहेत.
Bluei Torso मध्ये 1.69-इंचाचा IPS डिस्प्ले आहे. याशिवाय या घड्याळासोबत ऑलवेज ऑन डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. Bluei Torso चे स्क्रीन रिझोल्यूशन 240x280 pixels आहे. ब्राईटनेसच्या बाबतीत कंपनीने असा दावा केला आहे की, लख्ख सूर्यप्रकाशातही हे घड्याळ वापरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. Bluei Torso या घड्याळाची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊयात.
Bluei TORSO + चे डिटेल्स :
- Bluei TORSO एक चौरस डायल घड्याळासह येते.
- Bluei Torso चे डिझाईन Apple Watch सारखे आहे.
- Bluei TORSO मध्ये एक ड्युअल ऍक्सेस डायल पॅड आहे जो सेव्ह केलेले नंबर दाखवतो. कॉल हिस्ट्रीसुद्धा दिसू शकेल.
- Bluei Torso मध्ये 1.69-इंचाचा IPS डिस्प्ले आहे. याशिवाय या घड्याळासोबत ऑलवेज ऑन डिस्प्ले देखील उपलब्ध आहे.
- Bluei Torso चे स्क्रीन रिझोल्यूशन 240x280 pixels आहे आणि ब्राईटनेसबाबत कंपनीने दावा केला आहे की, थेट सूर्यप्रकाशात या घड्याळात कोणतीही अडचण येणार नाही.
- Bluei TORSO घड्याळात कॉल करण्यासाठी मायक्रोफोन आणि स्पीकर देखील आहे.
- कंपनीचा दावा आहे की ब्लूई TORSO वॉचवरून फोनचा कॅमेरा देखील अॅक्सेस करू शकता.
- Bluei TORSO ला वॉटरप्रूफ म्हणून IP68 रेट केले आहे.
- Bluei TORSO ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि रोझ गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे.
- Bluei TORSO घड्याळासह प्री-लोडेड स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील.
- हेल्थ वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Bluei TORSO हार्ट बीट स्पीड मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी एक SpO2 सेन्सरसह येतो.
- Bluei TORSO घड्याळात स्लीप ट्रॅकिंग देखील आहे.
- Bluei TORSO ची विक्री ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमधून 2,999 रुपयांना सुरू झाली आहे.
टीप : घड्याळाचे हे सगळे फिचर्स कंपनीकडून सांगण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :