Samsung Galaxy : Samsung Galaxy A13 आणि A23 भारतात लॉन्च, 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह 'हे' आहेत दमदार फीचर्स
Samsung Galaxy : Samsung ने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे.
Samsung Galaxy : Samsung ने भारतात आपले दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A13 आणि Galaxy A23 4G लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले आहे आणि ते Google च्या Android 12 व्हर्जनवर चालतात. यामध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. आणखी काय आहे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य जाणून घ्या.
Samsung Galaxy A13 चे फीचर्स :
Samsung Galaxy A13 मध्ये 6.6-इंचाचा TFT LCD डिस्प्ले आहे आणि तो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह आहे. हे माली G52 MP1 GPU सह जोडलेले Exynos 850 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज देखील आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्राथमिक कॅमेरा आहे. 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, परंतु वापरकर्त्यांना रिटेल बॉक्ससह फक्त 15W चा चार्जर मिळतो.
Samsung Galaxy A23 चे फीचर्स :
Samsung Galaxy A23 मध्ये 6.6-इंचाचा TFT LCD डिस्प्ले देखील आहे. कंपनीने अद्याप हे सांगितले नाही की, यात कोणता चिपसेट आहे. परंतु,असे सांगण्यात आले आहे की, Galaxy A23 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. कंपनीने याचे दोन प्रकार लॉन्च केले आहेत. एक म्हणजे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि दुसरा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जो microSD कार्डने वाढवता येतो. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 25W पर्यंत फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy A13 ची किंमत ?
14,999 रुपये, 4+128 व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आणि 6+128 व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये आहे. तर, Samsung Galaxy A23 6 GB व्हेरिएंटची किंमत 19,4999 रुपये आणि 8 GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे.
'या' दिवशी होणार Samsung Galaxy M33 5G लॉन्च :
Samsung Galaxy M33 5G इंडिया लॉन्च 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता होईल. हँडसेट 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करेल आणि 25W चार्जिंगसाठी 6,000mAh बॅटरीसह येईल. Samsung Galaxy M33 5G 6.6 इंच LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Google Doodle : गुगलने डूडलद्वारे दिल्या 'नवरोझ'च्या शुभेच्छा, पारशी नववर्षाबद्दल जाणून घ्या...
- Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर कराल तर... , कंपनी आणणार नवीन फिचर
- Google Maps crashes : गूगल मॅपच 'भटकलं', अनेकांना रस्ता शोधण्यात अडचण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha