एक्स्प्लोर
रिलायन्सचे LYF Flame 8 आणि LYF Wind 3 हे दोन नवे 4G स्मार्टफोन लाँच
नवी दिल्ली: रिलायन्स रिटेलने LYF Flame 8 आणि LYF Wind 3 हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. फ्लिपकार्टवर आजपासून सुरु होणाऱ्या फ्रिडम सेल ऑफरमध्येही हे दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध आहेत. कंपनीने ही माहिती आपल्या ट्विटर हॅण्डलच्या माध्यमातून दिली आहे.
कंपनीचा LYF Wind 3 हा स्मार्टफोन तीन महिन्यांसाठी जियो प्रिव्ह्यू ऑफरसोबत बुधवारपासून फ्लिपकार्टवर मिळेल. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4G कनेक्टिविटीसोबत Volte सपोर्ट मिळेल. LYF फ्लेम 8 ही या ऑफरसोबत मिळण्याची शक्यता आहे.
LYF विंड 3 या स्मार्टफोनच्या ब्लॅक कलर वेरिएंटची किंमत 6,999 रुपये, तर लाइफ फ्लेम 8 व्हाइट, ब्ल्यू आणि ब्लॅक रंगाचे वेरिएंट 4,199 रुपयांना उपलब्ध आहेत.
LYF विंड 3 आणि फ्लेम 8 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉइड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये एलइडी फ्लॅशसोबतच 8 मेगापिक्सलचा ऑटो फोकस रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी दोन्हीमध्ये 4G एलटीई सोबतच, वाय-फाय 802.11बी/जी/एन, ब्लूटूथ 4.0 जीपीआरएस आणि मायक्रो यूएसबीसारखे फिचर्स देण्यात आले आहे.
LYF विंड 3 स्मार्टफोनचे फिचर्स
1). LYF विंड 3 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा IPS डिस्प्ले असून त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1280 x 720 पिक्सेल आहे.
2). या स्मार्टफोनमध्ये 1.2GHz क्वाड कोर, 64 बिट स्नॅपड्रॅगन 410 (MSM8916) प्रोसेसर 2 जीबी रॅम आहे.
3). ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 306 GPU देण्यात आलेला आहे.
4). या स्मार्टफोनमध्ये 16GB इनबिल्ट स्टोरेजची क्षमता आहे. ती मायक्रो एसडी कार्डमार्फत 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
5). या ड्यूअल सिम फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.
6). फोनचा डायमेंशन 76.6 x 152.6 x 9.4 mm आणि 159.2 ग्रॅम वजन आहे.
7). LYF विंड 3 स्मार्टफोनमध्ये 2920mAh पॉवर बॅटरी देण्यात आलेली आहे.
LYF फ्लेम 8 स्मार्टफोनचे फिचर्स 1). LYF फ्लेम 8 स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाचा FWVGA IPS डिस्प्ले असून त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 854x 480 पिक्सेल आहे. 2). फोनमध्ये 1.1GHz क्वाड कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 (MSM8909) प्रोसेसर आणि 1GB रॅम आहे. 3). ग्राफिक्ससाठी 304 जीपीयू देण्यात आले आहे. 4). या फोनमध्ये 8GB इनबिल्ट स्टोरेज क्षमता असून ती मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते. 5). फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. 6). फोनमध्ये 2000mAh पॉवर बॅटरी देण्यात आलेली आहे.Here's what you will be winning today! 10 'LYF WIND 3' phones up for grabs. #FlipkartFreedomSale! pic.twitter.com/kqLz7tquLj
— Flipkart (@Flipkart) August 10, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement