Reliance Jio : इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग फ्री! रिलायन्स जिओ देतेय निवडक ग्राहकांना खास सुविधा
ग्रहकांना चार दिवसांसाठी फ्री अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा वापरता येणार आहे.
Reliance Jio : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही कंपनी ग्रहकांना चार दिवसांसाठी फ्री अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देणार आहे. ही सुविधा एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित आहे. आसाम आणि उत्तर पूर्व भागात तसेच आपातकालीन काळात ही सुविधा तुम्ही वापरु शकरणार आहात. टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर ही सेवा देत आहेत, जेणेकरून वापरकर्ते पूरग्रस्त भागात इतरांशी संपर्क साधू शकतील.
रिपोर्टनुसार, जिओच्या काही ग्राहकांना कोणत्याही नेटकवरेकवर चार दिवस फ्री अनलिमिटेड कॉल आणि डेटा बेनिफिट्स मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये युझर्स 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस तसेच चार दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. आसाममधील दिमा हासाओ, कार्बी आंगलाँग पूर्व, कार्बी आंगलाँग पश्चिम, होजई आणि कचार या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये राहणारे लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
आसाममधील काही जिओ युझर्सला कंपनीनं मेसेज सेंड केला. या मेसेजमध्ये माहिती देण्यात आली होती की, "गेल्या काही दिवसांतील हवामानामुळे तुमच्या सेवेच्या अनुभवावर परिणाम झाला. सदिच्छा म्हणून, आम्ही तुमच्या नंबरवर 4-दिवसांची अनलिमिटेड प्लॅन लागू केली आहे.' ज्या युझर्सला हा मेसेज आला आहे ते युझर्स हा अनलिमिटेड प्लॅन वापरु शकतात. तसेच जर तुम्हाला या प्लॅनबाबत अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही My Jio या अॅपमधून ही माहिती घेऊ शकता.
- जिओचा चार दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन जाणून घेण्यासाठी या स्टेप फॉलो करा
तुमच्या मोबाईलमधील My Jio हे अॅप ओपन करा.
अॅप ओपन केल्यानंतर स्क्रिनच्या डावा कोपऱ्यावर तुम्हाला हॅमबर्गर ओप्शन दिसेल. या हॅमबर्गर ओप्शनला सिलेक्ट करा. त्यामधील My Plans वर क्लिक करा. - त्यानंतर तुम्हाला कळेल की Jio चा चार दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन तुम्हाला मिळाला आहे की नाही?
हेही वाचा :