6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा 50 पट जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे
Samsung Electronics ने अलीकडेच एक नवीन योजना जाहीर केली आहे. ही योजना कंपनीच्या 6G नेटवर्कवर आधारित असून नेटवर्किंगच्या नेक्स्ट जनरेशन सॅन्डर्ड व्हिजनशी संबंधित आहे.
Samsung Electronics ने अलीकडेच एक नवीन योजना जाहीर केली आहे. ही योजना कंपनीच्या 6G नेटवर्कवर आधारित असून नेटवर्किंगच्या नेक्स्ट जनरेशन सॅन्डर्ड व्हिजनशी संबंधित आहे. कंपनीने 6G Spectrum: Expanding the Frontier या टायटलसह एक पेपर शेअर केला आहे. नेमकी काय आहे ही योजना, हे आपण जाणून घेणार आहोत.
याबाबत माहिती देताना सॅमसंगचे कार्यकारी उपसंचालक आणि अॅडव्हान्स कम्युनिकेशन्स रिसर्च सेंटरचे प्रमुख Sunghyun Choi यांनी सांगितले की, "आम्ही 6G कम्युनिकेशन टेकनॉलॉजि ओळखणे, विकसित करणे आणि सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यासाठी आमची योजना खूप लवकर सुरू केली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढील हायपर कनेक्टेड अनुभव प्रदान करण्यासाठी आमचे व्हिजन आणि त्याचे परिणाम दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोत.'' सोप्या भाषेत सांगायचे तर सॅमसंगने लवकरच बाजारात 6G टेकनॉलॉजि आणण्याची तयारी सुरू केली आहे.
याव्यतिरिक्त 6G ला अल्ट्रा-वाईल्डबँडसह स्पेक्ट्रम आवश्यक असेल. जे शेकडो MHz ते दहापट GHz पर्यंत असावे लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर, या हाय-एंड मोबाईलमध्ये योग्य स्तरावर होलोग्राम आणि इमर्सिव एक्स्टेंडेड रिअॅलिटी (XR) देखील असेल. कंपनी नेक्स्ट जनरेशन कम्युनिकेशन स्टँडर्डचे कव्हरेज सुधारण्यावरही भर देत आहे. परिणामी कंपनी 1GHz अंतर्गत लो बँड ते 1 ते 24GHz रेंजमध्ये मिड बँड आणि अगदी 24 ते 300GHz रेंजमधील हाय बँडपर्यंत 6G साठी उपलब्ध असलेल्या सर्व बँडचा विचार करत आहे.
सॅमसंगचा दावा आहे की, 6G 1 Tb पर्यंत इंटरनेट स्पीड देऊ शकतो. जे 5G नेटवर्कच्या 20Gbps पेक्षा 50 पट जास्त वेगवान आहे. जून 2021 मध्ये चाचणी दरम्यान, कंपनी 15 मीटर अंतरावर 6Gbps डेटा रेट पोहोचवण्यात यशस्वी राहिली. नेटवर्क 30 मीटर अंतरावर 12Gbps डेटा रेटने चालते. 120 मीटर अंतरावरही डेटा रेट 2.3Gbps पर्यंत पोहोचत होते. सॅमसंगने आपल्या 6G संशोधनाचे परिणाम आणि अधिक माहिती आगामी काळातही शेअर करण्याची योजना आखली आहे.