एक्स्प्लोर
रिलायन्सचा धमाका: 80 रुपयात 1 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

मुंबई: रिलायन्स जिओ लवकरच आपली 4जी सेवा सुरु करणार आहे. 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी 'फ्रीडम' नावाने पहिला प्लान लाँच करणार आहे. रिलायन्स जिओच्या या डेटा प्लानची किंमत ही दुसऱ्या कंपन्यांपेक्षा कमीत कमी 25 टक्के कमी असेल. तर व्हॉईस सर्व्हिस मोफत असणार आहे. म्हणजेच कॉलसाठी पैसे लागणार नाही. फक्त यासाठी रिलायन्स जिओचं 4G सिम असणं आवश्यक आहे. हे सिम खरेदी करण्यासाठी रिलायन्सचा कर्मचाऱ्याला भेटून त्याच्याकडून इनवाइट मिळणं गरजेचं आहे. एक कर्मचारी कमीतकमी 10 लोकांच्या सिमसाठी इनवाइट पाठवू शकतो. काही रिपोर्टनुसार, जिओच्या 1 जीबी डेटाची किंमत 80 रुपये असणार आहे. सध्या टेलिकॉम कंपन्या या 1 जीबी डेटासाठी 100 ते 120 रुपये आकारतात. जिओच्या 'फ्रीडम' प्लानमुळे दुसऱ्या कंपन्यांना आपल्या किंमती कमी कराव्या लागू शकतात. टेलिकॉम जगतातील वाढती स्पर्धा पाहून नुकतंच एअरटेलनं नाइट डेटा आणि हॅप्पी अवर्स सारख्या स्कीमची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांचा मात्र चांगला फायदा होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























