(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Realme GT 2 : Realme चा GT 2 फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च; 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 'या' स्मार्टफोनशी होईल स्पर्धा
Realme GT 2 Smartphone : Realme ने भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 लॉन्च केला आहे.
Realme GT 2 Smartphone : Realme च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! Realme ने भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. यामध्ये पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलरचा समावेश आहे. कंपनीने सध्या या स्मार्टफोनचे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य नेमके काय आहे.
डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.62 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा रीफ्रेश दर 120 Hz आहे.
फ्रंट आणि रियर कॅमेरा : यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8-मेगापिक्सलचा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल्सची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी : स्मार्टफोनला पॉवर बॅकअप देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे 65W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. कंपनीचा असा दावा आहे की, त्याची बॅटरी केवळ 33 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. यात टाइप सी पोर्ट आहे.
सॉफ्टवेअर : हे Google च्या Android 12 आधारित Realme UI 3.0 वर कार्य करते. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे आणि ड्युअल सिम 5G सपोर्टसह येतो.
रॅम आणि स्टोरेज : कंपनीने याचे दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. 8 जीबी रॅम वेरिएंटमध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तर, 12 जीबी व्हेरिएंटमध्ये 256 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.
किंमत : त्याच्या 8 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आणि 8 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 38999 रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 28 एप्रिलपासून Realme आणि Flipkart च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल. एचडीएफसी (HDFC) बँकेच्या कार्डने हे स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची सूट दिली जाईल. हा स्मार्टफोन Xiaomi 11T Pro 5G, Xiaomi 11 Lite NE 5G, OnePlus Nord 2, Motorola Edge 20, Samsung Galaxy S20 FE 5G, OPPO Reno7 5G, Vivo V21 5G, Mi Oppo7X Reno5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Galaxy M53 : 108 मेगा पिक्सलच्या दमदार कॅमेरासह सॅमसंग गॅलॅक्सी एम53 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...
- Amazon Sale : Oppo च्या या स्मार्टफोनवर लॉन्च होताच 20 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर उपलब्ध, वाचा सविस्तर
- Oppo F21 Pro : Oppo F21च्या सीरिजचे दोन धमाकेदार स्मार्टफोन भारतात लॉन्च, 'हे' आहेत दमदार फीचर्स