एक्स्प्लोर
193 रुपयात रोज 1GB डेटा, जिओला अनिल अंबानींची टक्कर
दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या डेटा स्पर्धेमध्ये आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशननेही उडी घेतली आहे. आरकॉमने प्रीपेड ग्राहकांसाठी खास 193 रुपयांचा प्लॅन आणला आहे.

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या डेटा स्पर्धेमध्ये आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशननेही उडी घेतली आहे. आरकॉमने प्रीपेड ग्राहकांसाठी खास 193 रुपयांचा प्लॅन आणला आहे. रिलायन्स जिओला हा प्लॅन टक्कर देणार आहे. या प्लॅनमध्ये आरकॉमच्या ग्राहकांना 193 रुपयांमध्ये 28 दिवस दररोज 1GB 2G/3G/4G डेटा मिळेल. तर व्हॉईस कॉलिंगसाठी दररोज एसटीडी आणि लोकल 30 मिनिटे मिळणार आहेत. रिलायन्स जिओने डेटा दर स्वस्त करण्याची स्पर्धा सुरु केली आहे. आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या सर्वच आघाडीच्या कंपन्यांची ग्राहकांना एकमेकांपेक्षा स्वस्त प्लॅन देण्याची चढाओढ सुरु आहे. त्यात आता आरकॉमनेही उडी घेतली आहे. व्होडाफोनचा 244 रुपयांचा प्लॅन रिलायन्स जिओने नवी ऑफर आणल्यानंतर इतर कंपन्यांनीही ऑफर देणं सुरु केलं आहे. एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही नव्या ग्राहकांसाठी 244 रुपयांचा खास प्लॅन आणला आहे. ज्याची व्हॅलिडिटी 70 दिवसांची असेल. या प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 1 GB डेटा देण्यात येईल म्हणजेच 70 दिवसांसाठी 70 GB डेटा मिळेल. पहिल्या रिचार्जवरच ही ऑफर मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच फक्त नव्या ग्राहकांसाठी ही ऑफर असेल. दुसऱ्यांदा रिचार्ज केल्यास या ऑफरची व्हॅलिडिटी केवळ 35 दिवसांसाठी असेल. मात्र 70 GB एवढाच डेटा दिला जाईल आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे. व्होडाफोनने याशिवाय 346 रुपयांची ऑफरही आणली आहे. ज्याची व्हॅलिडिटी 56 दिवसांची असेल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 3G/4G डेटा मिळेल. व्हॉईस कॉलिंगसाठी मर्यादा ठेवण्यात आली आहे. एका दिवसात 300 मिनिटे वापरता येतील, तर आठवड्यात 1200 मिनिटांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर व्होडाफोन अॅपवरुन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅकही मिळेल. (नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)
आणखी वाचा























