एक्स्प्लोर
Advertisement
सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय कराल?
मुंबई : सोमवारी कामाचा दिवस सुरु झाल्यानंतर जगभरात जवळपास दोन लाख कंपन्या आणि नागरिकांवर सायबर हल्ला झाला. या हल्ल्याचं संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
जगभरातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. यामध्ये 150 देशांना लक्ष्य करण्यात आलंय, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. हल्लेखोरांकडून पैशांची मागणी केली जात आहे.
सायबर हल्ल्यांची ही मालिका शुक्रवारी सुरु झाली. बँका, रुग्णालये, खाजगी आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्टची जुनी ऑपरेटिंग सिस्टम ओएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला.
इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा.
या सायबर हल्ल्यासाठी रेनसमवेयर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रेनसमवेयर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.
रॅनसमवेअरपासून बचाव कसा कराल?
- तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका
- ई-मेल करणारा व्यक्ती ओळखीचा आहे, मात्र ई-मेलचा विषय दररोजपेक्षा वेगळा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता, विस्कळीत असेल तरीही तो ई-मेल ओपन करु नये.
- जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रेडिफमेलवर तुमचे वैयक्तीक मेल ओपन करणं टाळावं.
- पेन ड्राईव्ह, पर्सनल पेन ड्राईव्ह किंवा कंपनीच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कचा वापर टाळावा.
- ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करताना सावधानता बाळगा
- फेसबुक, लिंकडेन आणि ट्विटरचा वापर कमीत कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये.
- तुमची सिस्टम हॅक झाल्याचा संशय आला, किंवा काही एरर मेसेज आल्यास तातडीने आयटी टीमशी संपर्क साधा
भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी
अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement