एक्स्प्लोर
रॅगिंगची तक्रार अॅपवरुन करा, खास अॅप लाँच
नवी दिल्ली : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रॅगिंगविरोधात तक्रार करण्यासाठी ‘अँटी रॅगिंग मोबाईल अॅप’ लाँच केलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने हे खास अॅप तयार केलं आहे.
विद्यार्थ्यांना रॅगिंगची तक्रार नोंदवण्यासाठी वेबसाईटचा आधार घ्यावा लागायचा. त्वरीत केलेल्या कारवाईमुळे रॅगिंगच्या तक्रारींमध्ये घट झाली होती, पण या समस्येला मुळापासून नष्ट करणं गरजेचं आहे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
नवीन विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास देणं गुन्हा आहे. अशा प्रकारचं वागणं खपवून घेतलं जाणार नाही. त्यासाठी ‘अँटी रॅगींग मोबाईल अॅप’ पीडित विद्यार्थ्यांसाठी चांगलं माध्यम असेल, असंही प्रकाश जावडेकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement