एक्स्प्लोर

OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...

OnePlus Nord 3 : लवकरच वनप्लस आणखी एक स्मार्टफोन लॉंच करणार आहे. हा स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंग देणारा आहे.

OnePlus Nord 3 : OnePlus ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Oneplus NOrd CE 2 लॉंच केला आहे. आता कंपनी आपल्या Nord सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन लॉंच करणार आहे. हा स्मार्टफोन OnePlus Nord 3 असू शकतो. 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus Nord 3 या वर्षात साधारण जुलै महिन्याच्या जवळपास लॉंच केला जाण्याची शक्यता आहे. नवीन OnePlus फोन मागच्या वर्षी जुलैमध्ये लॉंच झालेल्या OnePlus Nord 2 ची पुढील सीरिज असण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या मॉडेलमध्ये चार्ज 65 (65W) चार्जिंग टेक्नॉलॉजी होती. यामध्ये 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्जिंगची सुविधा देण्यात आली होती. 

150W फास्ट चार्जिंगची सुविधा :

या आठवड्याच्या सुरुवातीला MWC येथे, OnePlus सारख्याच असणाऱ्या Realme ने त्याचे 150W SuperVOOC चार्जिंग मानक घोषित केले. ज्याचा दावा आहे की, 15 मिनिटांत 4,500mAh बॅटरी पूर्णपणे चार्ज होईल. Realme ने स्वतःचे 150W चार्जिंग मानक देखील सादर केले ज्याला ते 150W अल्ट्राडार्ट चार्ज म्हणतात. रिपोर्टनुसार, OnePlus Nord 3 Realme GT Neo 3 वर आधारित असू शकतो. ज्याची घोषणा MWC 2022 मध्ये कंपनीच्या 150W चार्जिंग तंत्रज्ञानासह करण्यात आली होती. याशिवाय हा 5G स्मार्टफोन असेल. तसेच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

OnePlus ने अजून OnePlus Nord 3 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण तरीही, स्मार्टफोन कंपनीने जुलै 2020 मध्ये OnePlus Nord लाँच केल्यापासून वर्षातून एकदा नवीन Nord फ्लॅगशिप सादर करण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. OnePlus चा गेल्या दोन वर्षातील ऐतिहासिक रेकॉर्ड पाहता, OnePlus Nord 3 जुलैमध्ये मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. 

रेग्युलर OnePlus Nord आणि OnePlus Nord 2 तसेच OnePlus Nord CE आणि OnePlus Nord N मॉडेल्सचा समावेश असलेल्या OnePlus Nord सीरिजने ब्रँडच्या दाव्यानुसार अलीकडेच 10 मिलियन युनिट विक्री पार केली आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Embed widget