Instagram Feature : Instagram बंद करतंय 'हे' अॅप, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या...
Instagram Feature : इन्स्टाग्रामने (Instagram) घोषणा केली आहे की, इन्स्टाग्राम IGTV साठी या स्वतंत्र अॅप लवकरच बंद करणार आहे.
Instagram Feature : नुकतंच फेसबुकने (Facebook) स्पष्ट केले आहे की, कंपनी यापुढे शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट रिल्सवर (Reels) लक्ष केंद्रित करणार आहे. याच निर्णयाला धरून आता इन्स्टाग्रामने (Instagram) घोषणा केली आहे की, इन्स्टाग्राम IGTV साठी या स्वतंत्र अॅप लवकरच बंद करणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी पुढील महिन्यात अॅप स्टोअरमधून हे अॅप काढून टाकणार आहे. मेटा-मालकीच्या प्लॅटफॉर्मने IGTV व्हिडिओची संकल्पना (Concept) आणि फीड व्हिडिओ इन्स्टाग्राम व्हिडिओ नावाच्या एका युनिटमध्ये एकत्र केल्यानंतर काही महिन्यांनी ही हालचाल झाली आहे. "आम्ही मुख्य Instagram अॅपवर सर्व व्हिडिओ ठेवण्यावर लक्ष केंद्रित करू. तसेच, लोकांसाठी हे सर्व फीचर्स मुख्य अॅपमध्ये असणे सोयीचे आहे. त्याचबरोबर Instagram अॅपमध्ये व्हिडिओ ठेवणे सोपे होते. असं कंपनीचं म्हणणं आहे.
याशिवाय कंपनी फुल स्क्रीन व्ह्यूअर आणि टॅप टू म्यूट ऑप्शनसारखे फीचर्स लवकरच आणणार आहे. Instagram तुमचे व्हिडिओ शेअर करण्याचा मार्ग तयार करण्यासाठी, आणि कंटेंट शोधण्याचे नवीन मार्ग सादर करण्यासाठी देखील काम करत आहे. प्लॅटफॉर्म नवीन जाहिरात अनुभवाची चाचणी देखील सुरू करणार आहे. या माध्यमातून यूजर्सना त्यांच्या रीलवर दिसणार्या जाहिरातींमधून पैसे कमविण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे. जाहिरातींमधून मिळणारा महसूल हा बोनसपासून वेगळा असेल.
फीडवर पोस्ट केलेले व्हिडिओ आता 60 मिनिटांचे असू शकतात. इन्स्टाग्राम यूजर्स आता होमपेजच्या उजव्या बाजूस '+' वर टॅप करून 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकतात. होम पेजवरील व्हिडिओ प्रीव्ह्यू आता 60 सेकंद आहे.
महत्वाच्या बातम्या :
- POCO चा बजेट स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या POCO M4 Pro चे फीचर्स आणि ऑफर्स
- Samsung Galaxy : 12 हजारांच्या डिस्काऊंटसह सॅमसंगचा 'हा' टॅबलेट आहे खास, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स...
- Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha