आजपासून OnePlus Nord 2 5G विक्रीसाठी उपलब्ध; दमदार फिचर्सची युजर्ससाठी पर्वणी
OnePlus Nord 2 5G : One Plus चा प्रीमियम स्मार्टफोन OnePlus Nord 2 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. आजपासून हा स्मार्टफोन बाजारात विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे.
OnePlus Nord 2 5G : वन प्लसचा Nord 2 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला. वन प्लसच्या Nord सीरीजचा हा तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी या सीरीजमधील OnePlus Nord आणि OnePlus Nord CE 5G हे फोन लॉन्च करण्यात आले होते. 26 जुलैपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. OnePlus Nord 2 5G ची थेट स्पर्धा Poco F3 GT आणि Realme X7 Max यांसारख्या स्मार्टफोनशी होणार आहे. हा फोन पॉवरफुल फिचर्सनी परिपूर्ण आहे. जाणून घ्या OnePlus Nord 2 5G चे दमदार फिचर्स...
OnePlus Nord 2 5G मध्ये 6.43 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे दोन व्हेरियंट्स 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज, तसेच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसोबत लॉन्च करण्यात आले. फोनमध्ये 4500mAhची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबतच सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लू हेज, ग्रे सिएरा आणि ग्रीन वुड्स कलर्सच्या ऑप्शन्समध्ये देण्यात आला आहे.
किंमत
OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये असणार आहे. परंतु, सध्या हे मॉडेल आता उपलब्ध नाही. तर याच्या 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 29,999 रुपये असणार आहे. याव्यतिरिक्त फोनचा टॉप व्हेरियंट 12GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 34,999 रुपये ठरवण्यात आली आहे.
कॅमेरा
OnePlus Nord 2 5G मध्ये जबरदस्त कॅमेरा फिचर्स युजर्सना पाहायला मिळतील. यामध्ये एआय व्हिडीओ एन्केसमेंट फिचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे रेकॉर्डिंगचा वेळ HDR इफेक्ट सुरु होईल. यामुळे शानदार कॅमेरा रिझल्ट मिळतील. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो.
दरम्यान, कंपनीनं OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनसोबत OnePlus Buds Pro देखील लॉन्च केले आहेत. गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus Budsचं हे अपडेटेड वर्जन आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे, कंपनी याला अॅक्टिव नॉइस कॅन्सलेशन (ANC) सपोर्टसोबत बाजारात आणणार आहे. या इयरबर्ड्समध्ये उत्तम साउंड क्वॉलिटीसोबत टच आणि जेस्चर कंट्रोलही मिळेल. तसेच यामध्ये 30 तासांहून अधिक बॅटरी बॅकअप मिळू शकते. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.