'अशी' आहे OnePlus 9 Pro ची पहिली झलक, जाणून घ्या कधी होणार लॉन्च?
OnePlus 9 सीरिजला पहिला अॅमेझॉनवर लॉन्च केलं जाणार आहे. या फोनचे लॉन्चिंग एका व्हर्च्युअल इव्हेन्टमध्ये करण्यात येणार आहे.
OnePlus 9 Pro : मोबाईल प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. OnePlus च्या वतीनं आता भारतात OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro हे मोबाईल लॉन्च होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, OnePlus 9 Pro भारतात येत्या 23 मार्चला लॉन्च होणार असल्याची बातमी आहे.
OnePlus 9 Pro सोबत OnePlus 9 Pro मध्ये 65 वॉटचा वायरलेस चार्जर उपलब्ध असेल. OnePlus 9 सीरिज ही टॉप-ऑफ- द-लाइन फ्लगशिप 50 वॉट वारयलेस चार्जिंगला सपोर्ट करतं. हे OnePlus 8 मध्ये असलेल्या 30 वॉट वायरलेस चार्जिंगचे एक महत्वपूर्ण अपडेट्स आहे. फास्ट चार्जिंगसाठी कंपनीने एक नवीन पॉवर अडॅप्टरदेखील लॉन्च केलं आहे. यामध्ये 4500mAh च्या बॅटरीचा वापर करण्यात येणार आहे.
कंपनीकडून OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro चे लॉन्चिंग केलं जाणार आहे. यामध्ये बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिन्ट सेन्सरदेखील देण्यात आलं आहे. यामध्ये फोटो क्वॉलिटीची योग्य दखल घेण्यात आली आहे. यामध्ये 48 मेगापिक्सेल चा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा डिस्टॉर्शन फ्री अल्ट्रा-वाइड लेन्स, 8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :