एक्स्प्लोर

मच अवेटेड वनप्लस 6 च्या लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला!

वनप्लस 6 हा स्मार्टफोन 17 मे रोजी लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या चीनच्या वेबसाईटवर ही घोषणा करत टिझर लाँच केला. शिवाय कंपनीने या फोनचं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे.

मुंबई : मच अवेटेड वनप्लस 6 या स्मार्टफोनच्या लाँचिंगची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. वनप्लस 6 हा स्मार्टफोन 17 मे रोजी लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या चीनच्या वेबसाईटवर ही घोषणा करत टिझर लाँच केला. शिवाय कंपनीने या फोनचं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे. चीनमध्ये 17 मे रोजी सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता) लाँचिंग इव्हेंट होईल. या कार्यक्रमाचे तिकीटही उपलब्ध होणार आहेत. ज्यांना कार्यक्रम पाहायचा आहे, त्यांना 27 एप्रिलपासून तिकिटं बूक करता येतील. कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी मार्वल स्टुडिओसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर व्हेरिएंट लाँच केलं जाणार आहे. त्यामुळे अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर या सिनेमाचं तिकीट प्रेक्षकांना वनप्लसकडून मोफत दिलं जाणार आहे. 27 एप्रिलला लाँच होणाऱ्या सिनेमासाठी सहा हजार तिकिटं दिली जातील, जे 27, 28 आणि 29 एप्रिलसाठी असतील. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, चंदीगड, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमधील वनप्लसच्या ग्राहकांना ही तिकिटं खरेदी करता येतील. तिकीट मिळवण्यासाठी ग्राहकांना वनप्लसच्या वेबसाईटवर जाऊन आपला IMEI नंबर टाकावा लागेल. त्यानंतर शहर निवडून गेट इट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तिकीट मिळेल. वनप्लस 6 मध्ये खास काय? वनप्लस 6 या फोनच्या लाँचिंगपूर्वी अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. त्यानुसार या फोनचे व्हाईट, ब्लॅक आणि ब्ल्यू असे तीन व्हेरिएंट येऊ शकतात. यामध्ये आयफोन X प्रमाणे जेस्चर कंट्रोल सपोर्ट फीचर असू शकतं. याशिवाय वनप्लस 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 845 SoC आणि 8GB रॅम असू शकते, असाही दावा करण्यात आला होता. वनप्लस 6 मध्ये 256GB इंटर्नल स्टोरेज दिलं जाईल, असं बोललं जातं. या फोनचं अॅव्हेंजर्स व्हेरिएंटही लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंपनीने वनप्लस 5T या फोनचंही स्टार वॉर्स लिमिटेड व्हेरिएंट लाँच केलं होतं. मोठी स्क्रीन, एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर असे फीचर्स असू शकतात. हा फोन यावर्षी जूनपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget