वनप्लसचा भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फोनबाबतच्या 11 गोष्टी!
OnePlus10 Pro 5G हा फोन अधिकृतपणे भारतात लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे.
मुंबई : OnePlus10 Pro 5G हा फोन अधिकृतपणे भारतात लॉन्च झाला आहे. चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने 31 मार्च रोजी एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला. OnePlus 10 Pro 5G मध्ये Hasselblad कॅमेरा टेक्नोलॉजी, पॉवरफूल प्रोसेसर आणि इतर फीचर्स असून एक मोठा डिस्प्ले आहे. आम्ही तुम्हाला वनप्लसच्या नव्या आणि भारतातील सर्वात महागड्या स्मार्टफोनबाबत 11 आवश्यक गोष्टी सांगणार आहोत.
1. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर आहे. शिवाय यात एलपीडीआर 5 रॅम आणि यूएसएफ 3.1 स्टोअरेज आहे. फोन 8GB रॅम आणि 12GB रॅम व्हेरिएंटमध्ये येतो.
2. हा फोन 5 एप्रिलपासून Amazon India आणि One Plus च्या अधिकृत वेबसाईटवर विकला जाईल.
3. OnePlus 10 Pro 5G मध्ये 6.7-इंचाचा LTPO (कमी-तापमान पॉलीक्रिस्टलाइन ऑक्साईड) डिस्प्ले आहे, जो कंटेट टाईपनुसार त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 1Hz दरम्यान अॅडजस्ट करण्याची सुविधा देतो.
4. OnePlus 10 Pro 5G मध्ये Android 12 वर आधारित Oxygen OS 12.1 देण्यात आली आहे.
5. OnePlus 10 Pro 5G व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट कलरमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
6. या कंपनीचा भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 71,999 रुपये आहे, तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 66,999 रुपये आहे.
7. OnePlus 10 Pro 5G मधील कॅमेऱ्यात Hasselblad टेक्नॉलॉजी घेतली आहे. यामध्ये Expanse Mode, Hasselblad Natural Color Optimization यांसारखे वैशिष्ट्ये आहेत.
8. OnePlus 10 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP Sony IMX789 प्राथमिक सेन्सर, 50MP Samsung ISOCELL JN1 सेन्सर 150° अल्ट्रा-वाइड युनिट आणि OIS सह 8MP 3.3x टेलीफोटो शूटर आहे.
9. OnePlus 10 Pro 5G हा स्मार्टफोन 4K मध्ये 120 fps आणि 8K मध्ये 24 fps पर्यंत रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. OnePlus 10 Pro 5G ड्युअल-व्ह्यू व्हिडीओला सपोर्ट करतो, जेणेकरुन युझर्सना वापरकर्त्यांना डिव्हाइसच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यांमधून एकाच वेळी रेकॉर्ड करण्याची परवानगी देते.
10. स्मार्टफोनमध्ये जलद चार्ज सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. 80W SUPERVOOC OnePlus 10 Pro 5G ची 5,000 mAh बॅटरी 1 ते 100% पर्यंत चार्ज होण्यासाठी 32 मिनिटे लागतात. OnePlus 10 Pro हा फोन 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो जे 47 मिनिटांत 1 ते 100% पर्यंत फोन चार्ज करु शकते.
11. या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात 32MP Sony IMX615 सेंसर देण्यात आला आहे. हा कॅमेऱ्यात नाईट मोड आहे.