एक्स्प्लोर
किंमत 1599 रुपये, नोकियाचा नवा फीचर फोन लाँच
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने हा फोन खरेदी करता येऊ शकतो. तीन कलर व्हेरिएंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे.

नवी दिल्ली : नोकियाने भारतीय बाजारात नोकिया 130 हा फोन लाँच केला आहे. 1599 रुपये किंमतीचा नोकिया 130 हा फोन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने खरेदी करता येऊ शकतो. तीन कलर व्हेरिएंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. नोकियाने काही दिवसांपूर्वीच नोकिया 3310 हा फीचर फोन लाँच केला होता, ज्याला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. त्यानंतर कंपनीने नोकिया 105 हा फोनही बाजारात आणला आहे. नोकिया 130 या फोनला 1.8 इंच आकाराचा QVGA कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. VGA कॅमेरा, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, एलईडी टॉर्च आणि MP3 प्लेयर असे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. दरम्यान जिओनेही याच किंमतीमध्ये जिओ फोन लाँच केला आहे. या फोनची प्री-बुकिंग 24 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आली होती. मात्र जास्त प्रतिसाद मिळाल्याने एकाच दिवसात प्री-बुकिंग थांबवण्यात आली. एकाच दिवसात 60 लाख ग्राहकांनी हा फोन बुक केला. आता नोकियाचा फोन या फोनला बाजारात आव्हान देणार आहे.
आणखी वाचा























