एक्स्प्लोर
मार्शमेलो ओएसवर चालणारा मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन, किंमत केवळ....
मुंबई : मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीमने सज्ज असलेला नवा आणि स्वस्त स्मार्टफोन मायक्रोमॅक्सने लाँच केलाय. मायक्रोमॅक्सचा हा नवा स्मार्टफोन कॅनव्हास सीरिजमधील आहे. या स्मार्टफोनचं नाव मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लस असं आहे आणि याची किंमत फक्त रू. 3999 आहे. हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडिलवरच उपलब्ध होणार आहे.
मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास 6 आणि कॅनव्हास 6 प्रो या हायएन्ड स्मार्टफोनच्या लाँचिंग कार्यक्रमात स्पार्क 2 प्लस लवकरच लाँच करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं होतं. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी हा अतिशय स्वस्तातला स्मार्टफोन मायक्रोमॅक्सने लाँच केलाय. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी मार्शमेलो या सर्वात अद्ययावत ओएसने सज्ज असलेला स्पार्क 2 प्लस मेटॅलिक ग्रे, कॉपर गोल्ड आणि शँपेन गोल्ड अशा तीन रंगात उपलब्ध करून देण्यात आलाय.
स्पेसिफिकेशनच्या बाबतीत सांगायचं तर मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लस स्मार्टफोनला 480X854 पिक्सेलचा FWVGA प्रकारातील पाच इंची डिस्प्ले आणि 1.3GHz क्षमतेचा क्वाडकोअर प्रोसेसर आहे. तसंच स्पार्क 2 प्लसमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ही मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लसची बॅटरी 2000 mAh क्षमतेची आहे. तसंच कनेक्टिव्हिटी जीपीआरएस, ईडीजीई आणि 3जी स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे. तसंच ब्लूटूथ, वायफाय आणि मायक्रोयूएसबी ही संपर्क व्यवस्था या स्मार्टफोनसोबत आहे.
या स्मार्टफोनच्या लाँचिगच्या कार्यक्रमात मायक्रोमॅक्सचे मुख्य वितरण अधिकारी शुभजीत सेन यांनी स्पष्ट केलं ही अतिशय स्वस्तातला हा स्मार्टफोन सध्या फीचर किंवा बेसिक फोन वापरत असलेल्या यूजर्सनी स्मार्टफोन वापरावा यासाठीच खास बनवण्यात आला आहे. त्यांना आवश्यक तेवढीच स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनसोबत देण्याती आलीत. तसंच हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडिल या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरच उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लसची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स थोडक्यात :
स्क्रीन डिस्प्ले : 5 इंच
स्क्रीन रिझोल्यूशन : 480X854 पिक्सेल FWVGA
प्रोसेसर : 1.3GHz क्वाडकोअर
रॅम : 1 जीबी
इनबिल्ट मेमरी : 8 जीबी
मेमरी (मायक्रोएसडी) सपोर्ट : 32 जीबी
फ्रंट (सेल्फी) कॅमेरा : 2 मेगापिक्सेल
रिअर (मुख्य) कॅमेरा : 5 मेगापिक्सेल
बॅटरी : 2000 mAh
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्राईड 6.0 मार्शमेलो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement