Kia Sonet iMT Review: जाणून घ्या कोणत्या गोष्टींमुळे बनते ही कार स्पेशल?
Kia Sonet iMT Review: या कारचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या काळात ही कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
Kia Sonet iMT Review: कधी-कधी कारचे काही तास ड्राइव्हिंग केल्यानंतर तिच्याबद्दल अंदाज लावता येतो. पण ज्यावेळी तुम्ही त्या कारचा काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी वापर केला तर ती कार तुम्हाला किती सोयीस्कर आहे याचा खरा अंदाज येतो.
आम्ही नुकतंच Sonet iMT टर्बो पेट्रोल ही नवी कॉम्पॅक्ट एसयूवी वास्तवात किती चांगली आहे हे पाहण्यासाठी तिच्या सोबत काही काळ व्यतीत केला. या कारचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या ही कार सर्वात जास्त विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे.
सर्वप्रथम याच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो खूप आकर्षित आहे. याचे डिझाइन चांगल्या प्रकारे करण्यात आलं आहे. त्यातील स्कल्प्टेड लाइन, रॅपराउंड ट्रीटमेंट, टायगर नोज ग्रिल आणि सर्वच डिझाइन डिटेल याला एक आकर्षक एसयूव्ही बनवते.
कारच्या आतमध्ये काही काळ घालवल्यानंतर लक्षात येतं की याचे सॉनेट मूळ रुपातील सेल्टॉसप्रमाणे भासते ज्याची स्वत:ची काही विशेषता आहे. गुणवत्तेचा विचार केला तर ही कार अधिक चांगली आहे. कारण याचे सॉनेट आतील बाजूने या कारला एका कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा फील देत नाही. याचा अर्थ असा आहे की खूप कमी कॉर्नर्समध्ये काटछाट करण्यात आली आहे.
सेल्टोसच्या तुलनेत गुणवत्तेशी तडजोड करण्यात आली नाही. आपण ज्याला स्पर्श करता ते स्टीअरिंग व्हील प्लस बटन, विशाल टच-स्क्रीन, हे सर्व चांगला फिल देतात. स्टीअगरिंगला अॅडजेस्टमेंट मिळू शकली नाही पण ड्रायव्हिंग करताना आपल्याला कोणतीही अडचण येत नाही. पुढच्या सीट्स आरामदायक आहेत. पण मागच्या सीटवर उंच व्यक्तीसाठी काही प्रमाणात जागेची अडचण येऊ शकते. दोन व्यक्तींसाठी ही जागा ठिक आहे.
'या' आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स, GNCAP ने दिले 5 स्टार रेटिंग
याचे व्हॉइस असिस्टंट फीचर खूप चांगले आहे आणि चांगल्या प्रकारे कामदेखील करते. यातील 7-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टमदेखील खूप चांगल्या प्रकारे काम करते. यात पार्किंग सेन्सरच्या सोबत एक क्रिस्प रियर कॅमेरा प्लस मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. त्यामुळे अवघड जागेत याचे पार्किंग करण्यात मदत होते.
Sonet टर्बो-पेट्रोल कार iMT किंवा DCT सोबत उपलब्ध आहे. आम्ही iMT निवडलं कारण हे DCT पेक्षा खूपच स्वस्त आहे आणि याची "मॅन्युअल विदाउट क्लच" टॅगलाइन वास्तवात आपल्या ड्रायव्हिंगला कमी तणावपूर्ण करते की नाही त्यातून लक्षात येतं. यातील 3-सिलेंडरचा आवाज चांगल्या प्रकारे कंप्रेस्ड आहे पण iMT चा विचार केला तर तुम्ही एक मॅन्युअल प्रमाणे ड्राइव्ह करता आणि तेही तुमच्या डाव्या पायाचा वापर न करता. हे थोडं वेगळं वाटतं पण याची सवय होऊन जाईल. याला AMT च्या स्वरूपात न समजता मॅन्युअलच्या स्वरुपात ड्राइव्ह करावं लागेल. याचा अर्थ असा आहे की या कारला न्युट्रल स्वरुपात सुरु करायचं आणि व्यवस्थित शिफ्ट कराव लागेल.
नवी गाडी घेताय? थोडी वाट पाहा; भारतात लॉन्च होणार 'या' पाच नव्या कार
स्टॉप-गो ट्रॅफिकमध्ये इतका महाग क्लच रिपेयर ही एक अशी समस्या आहे जी टाळता येऊ शकत होतं. हे खराब ड्रायव्हिंगलादेखील ठिक करु शकते आणि मॅन्युअस आणि स्वयंचलित यांच्यातील अंतर थोडं कमी करु शकतं. याचा वापर आपल्याला मॅन्युअलच्या स्वरुपात करावा लागेल. आम्ही या कारला धक्का दिला असता असं लक्षात आलं की याच्या गियर शिफ्ट करण्याच्या पध्दतीत फरक आहे.
या कारची ड्रायव्हिंग एकदम स्मूथ आहे आणि याच्या टर्बो पेट्रोलमध्ये चांगल्या प्रकारचा टार्क आहे. याचा अर्थ असा आहे की ही कार शहरातील ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे.
सोनेट iMT चे मायलेज DCT पेक्षा चांगले आहे आणि अधिक आरामदायीदेखील आहे. आम्ही याची जवळपास 12/13 kmpl ने शहरात आणि इतर भागातही ड्रायव्हिंग केलं. शहरातील ड्रायव्हिंगसाठी आम्हाला ही कार चांगली वाटली आणि हाय-वे वर वेगवान गतीने चालवतानाही सोयीस्कर वाटलं. सोनेटला Kia कारप्रमाणे स्पोर्टी होण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. यात ग्रिप आणि कंपोजरदेखील चांगला वापरण्यात आला आहे.
याचे स्टिअरिंगदेखील चांगलं आहे. एका छोट्या रोड ट्रिपच्या दरम्यान आम्ही ट्रिपल डिजीटचे स्पीड गाठले तर सोनेटने चांगला परफॉर्मन्स दाखवला. DCT मॉडेल तर सगळ्या बाजूनं चांगली आहे. पण iMT अधिक कनेक्टेड वाटते.
एकूणच सोनेट एक चांगला प्रोजक्ट आहे. सोनेट मूळातच सेल्टोसप्रमाणे आहे परंतु याच्या काही विशेषता आहेत. ही स्वस्त नाही पण GTX Plus Imt साठी सुरुवातीची किंमत 12 लाखांपासून सुरु होते. क्वॉलिटी, सुविधा आणि ड्रायव्हिंग याचा प्रचार केल्याप्रमाणे चांगल्या गुणवत्तेच्या आहेत. पण याच्या मागच्या बाजूच्या सीटची स्पेस थोडी कमी वाटली.
एकूणच सोनट एक अशी प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे जिच्यावर तुम्ही जेवढा खर्च करता तेवढा परतावा तुम्हाला मिळणं शक्य आहे.
आम्हाला यात काय आवडलं- याचा लूक, फीचर्स, परफॉर्मन्स, iMT गियरबॉक्स
काय आवडलं नाही- किंमत महाग, मागील बाजूला कमी स्पेस
Hyundai i20 Turbo DCT Automatic review: जाणून घ्या का खरेदी करायची नवीन Hyundai i20?